Posts

Showing posts from May 17, 2020

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार अर्सेनिक अल्बम 30 औषधाचे  वाटप

Image
        पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त खारघर आणि खारघर गावात नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 ह्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप करून साजरा करणार असल्याची माहिती  स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली. सोमवार 18 मे रोजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस आहे. कोरोंनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोंनाचे  रुग्ण सापडल्याने आणि 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये  रुग्णांचे  प्रमाण जास्त आहे. कारण याठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.  नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घेतल्यास कोरोंनावर मात केली जाऊ शकते .नागरिकांची  प्रतिकारशक्ती वाढावी  यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत सोमवार 18  मे रोजी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त खारघर येथे  स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील अर्सेनिक अल्बम 30

देवदूत डॉ. मीनल भोसले यांची पत्रकारांना औषधरुपी केली अशीही मदत... 

Image
        Covid19 या रोगाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे पनवेल प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांना केले मोफत वाटप.   ' स्टार पनवेल' वर्तमान पत्राचे संपादक तथा 'पनवेल प्रेस' क्लबचे उपाध्यक्ष लाख दिलाचा माणूस श्री. अनिल राय यांनी केले विशेष प्रयत्न.  जितेंद्र नटे / पनवेल  raigadmat.page संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, सरकार यांच्या समवेत पत्रकार ही लढत आहेत. सरकारी सेवेत असणाऱ्यांची काळजी सरकार घेत असतो. मात्र पत्रकार जगाला माहिती देऊन जन जागृती करण्याचे 'बिन पगारी, फुल अधिकारी' म्हणून काम जरी करीत असला, तरी त्याची दखल मात्र घेताना कोण दिसत नाही? उलट कितीही समाजासाठी केले तरी लोकांचे बोलणे मात्र त्याला एकूण घ्यावेच लागते.  मात्र असल्या परिस्थितीतही काही लोक नक्कीच दखल घेताना दिसून येतात. पनवेल मधल्या अशाच एक उद्योनमुख - प्रतिभावंत डॉक्टर डॉ. मीनल भोसले या पत्रकारांसाठी देवदूत ठरल्या आहेत. त्यांनी Covid19 या रोगाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक