Posts

Showing posts from May 16, 2020

कुणबी समाज ठाकरोळी विभाग यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Image
            म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर   म्हसळा तालुक्यातील चिरगाव सडकेची वाडी (सितपाचा कोंड) येथे म्हसळा तालुका कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई यांच्या तर्फे शनिवारी तालुक्याचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्या उपस्थितीत समाजातील गोर गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  ठाकरोळी विभाग कुणबी समाज मुंबई अध्यक्ष रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात, वाडीवर जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहेत. यावेळी विभागीय अध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष संतोष घडशी, सल्लागार राजु जाधव, शंकर तिलटकर, गजानन शिंदे, ग्रामिण उपाध्यक्ष मोहन शिंदे, सहदेव खामकर, सुरेश कुळे, ग्रामिण सहसचिव मंगेश मुंडे, युवक अध्यक्ष सुनील शेडगे, संदिप मोरे, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर सर, प्रमोद कापडी, युवक सेक्रेटरी महेंद्र जाधव, क्रिडा अध्यक्ष सुरेश शिंदे, खजिनदार रामचंद्र खेरटकर, मंगेश आग्रे, गणेश भुवड, समिर खेरटकर, रूपेश शिगवण, अंकुश कांबळे, चेतन मोरे, सुनील आग्रे, अभि मोरे, प्रदिप मोरे आदी विभागीय पदाध...

ठाकूर कुटुंबियांकडून मदतीचा ओघ सुरूच

Image
          पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील गोरगरीब कुटुंबाना श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या विद्यमाने हजारो कुटुंबाना जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.            कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो ठाकूर कुटुंबिय समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून येत असतात हे फक्त पनवेल, रायगड नाही तर राज्याने पाहिले आहे. त्यामुळे  ठाकूर कुटुंबीय सर्व समाजाचा आधार म्हणून परिचित आहे.  सहकार्याने भाजपा पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते विनोद घरत, वासुदेव घरत, निर्दोष केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान गायकर, जगदीश घरत, जयवंत घरत, प्रभाकर जोशी, अल्पसंख्यांक समाजाचे नेते मन्सूर पटेल, साजिद पटेल, सचिन वास्कर, जयदास तेलवणे,...

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचविण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी    - आमदार प्रशांत ठाकूर 

Image
          पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका क्षेत्र व परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोना रोगाची लागण होण्यापासुन बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती समस्त पनवेलकर जनतेला मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आज (१२) केली आहे.         आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात, मुंबई पालिकेत पनवेल व इतर भागातून रोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाऊले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी केल्याचे नमूद करून या संदर्भात मुंबई महापालिकेतर्फे या कर्मचाऱ्यांची सोय मुंबईमध्येच करण्याचे जाहीर झाले होते, परंतु याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्य...

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कोविड योध्यांना फेस शिल्डचे वाटप  

Image
          पनवेल : राज भंडारी    राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून कोविडसाठी झटणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, मनपा कर्मचारी आणि पत्रकारांना तब्बल ३००० फेस शिल्डचे वाटप पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले. बुधवारी पनवेलमधील पत्रकार बांधवांसह पालिकेच्या सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना या फेस शिल्डचे वाटप आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या आवारात करण्यात आले.    संपूर्ण देशभरात कोरोनासारख्या महामारीने आपले आक्राळ विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केले, त्यामुळे या कोरोनाच्या युद्धामध्ये लढणाऱ्या योध्यांची काळजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन खरंतर सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी घेतला असल्याचे समोर आले आहे. ज्या दिवसापासून देशभरात संचारबंदी लागू झाली त्यावेळेपासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून भुकेलेल्यांच्या पोटात अन्नाचा घास भरविण्याचे काम या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले. तसेच या युद्धामध्ये अहोरात्...

विवाहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे दाम्पत्यांकडून  महापौर सहाय्यता निधीस ५० हजाराची आर्थिक मदत

Image
          पनवेल(प्रतिनिधी) विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह वाढदिवस म्हणजे एक सोहळाच असतो व तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण पनवेलमधील के. जी. म्हात्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी विवाहाचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा न करता ५० हजार रुपयांची आर्थिक मदत महापौर सहाय्यता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.              पनवेल पंचायत समिती कार्यालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक व सध्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल जनसंपर्क कार्यालय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले  के.जी म्हात्रे व त्यांच्या पत्नी पनवेल नगरपालिकेच्या सेवानिवृत् त मुख्याधिपिका उर्मिला म्हात्रे या या उभयताच्या विवाहास ५० वर्ष झाले. त्यांनी लग्नाचा हा वाढदिवस साजरा न करता...

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून इको वाहन चालकांना मदतीचा हात 

Image
        पनवेल(प्रतिनिधी) दररोजच्या प्रवासी वाहतुकीद्वारे कुटुंबाचा उदर निर्वाह चालविणाऱ्यांवर कोरोना व लॉक डाऊन परिस्थितीमुळे संकट आले आहे. अशा इको प्रवासी वाहतूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील १६०० चालकांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्यावतीने जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहन चालकांना मदतीचा हात दिला आहे.            माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात ३० हजार पेक्षा जास्त कुटुंबाना जीवनावश्यक अन्न धान्य देण्यात आले असून ठाकूर कुटुंबाकडून गरीब गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे.            पनवेल तालुका परिसरातील अनेक प्रवासी इको या चार चाकी वाहनाने प्रवास करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे प्रवास बंद आहे. त्यामुळे इको वाहनचालकांना दररोजचे आर्थ...

खांदा वसाहतीत स्वच्छता दुतांवर पुष्पवर्षाव,आठ दिवसांचा ,कोरडा शिधा देऊन व्यक्त केली कृतज्ञता,नगरसेविका सिताताई पाटील आणि सुनील खाडे यांचा पुढाकार

Image
  पनवेल/ प्रतिनिधी: कोरोना या वैश्विक संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दुतांवर गुरुवारी खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. इतकेच नाही. तर या कामगारांना आठ दिवस पुरेल इतके धान्य देऊन एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाने आरोग्य दूत अक्षरशः भारावून गेले.  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या महामारी रोगामुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काही व्यक्तींचा मृत्यूही या आजाराने झालेला आहे.  कोरोना विषाणूंचे संक्रमण होणे म्हणून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीत. या संकटातही पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. मनपा क्षेत्रातील रस्ते, पदपथ स्वच्छ करणे, झाडू मारणे, झाडाचा पालापाचोळा जमा करणे, डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलित करणे, परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, पावडर मारणे यासारखी अनेक कामे सं...

टंचाईग्रस्त भागांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी श्रीवर्धन  पंचायत  समिती  सिद्ध 

Image
         (भारत जाधव)                 श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत               2020 च्या उन्हाळ्यात पाणी टंचाई ग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. श्रीवर्धन पंचायत समिती कडून मिळालेल्या माहितीनुसार या आराखड्यामध्ये 21 गावे आणि 55 वाड्या अशा एकूण 76 गावांचा पाणी टंचाई निवारणार्थ  आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच 14 गाव आणि 22 वाड्यांसाठी एकूण 36 नवीन विंधण विहिरींची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारा अंदाजित खर्च  रु. 57 लाख एवढा प्रस्तावित केलेला आहे.             सद्यस्थितीत श्रीवर्धन पं. स. कडे साक्षीभैरी, वावे तर्फ श्रीवर्धन, आदिवासी वाडी, कोंढे पंचतन, शेखाडी, साखरी, नागलोली मूळगाव, नवी वाडी, मधली वाडी, धनगर मलई, आदगाव कोळीवाडा, इ. गावे /वाड्यांना टँकरमार्फत पाणी पुरवठा करणेबाबतचे प्रस्ताव पं. स. कडे प्राप्त झाले  असून दि. 7 मे 20 पासून टँकर अधिग्रहण करण्यात आला आहे. ...