अबोली महिला रिक्षा चालक संघटनेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मदतीचा हात
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीच्या अनुषंगाने अबोली महिला रिक्षा चालक संघटनेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात दिला आहे. लॉकडाउन मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. अबोली महिला रिक्षा चालकांवरही व्यवसायाभावी उपाशी राहण्याची वेळ आली होती. अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष तुकाराम भगत यांनी सदर बाब दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवणावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. सदर वस्तूंचे वाटप संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी नवीन पनवेल येथे केले. यावेळी संघटनेचे सचिव विलास मोरे उपाध्यक्ष शालिनी गुरव खजिंदार ललिता राउत आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तत्परतेने केलेल्या मदती बद्दल सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले