रुग्ण सापडलेल्या सोसायटी प्रशासनाने त्वरित सील कराव्यात, असे पत्र खांदा कॉलोनी वार्ड क्र. 15 चे नगरसेवक तथा प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी केली आहे.
कोरोनाबाधीत कुटुंबियांच्या चाचण्या फास्ट ट्रॅकवर करण्यात याव्यात त्याकरता विलंब होऊ नये. येणारा खर्च महापालिकेने उचलावा असाही आग्रह प्रभाग समिती सभापतींनी धरला आहे. पनवेल / जितेंद्र नटे raigadmat.page खांदा कॉलोनी येथे अनेक सोसायटी मध्ये कुटुंबीतील सदस्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान संबंधितांना त्वरित क्वारंन्टाइन करावे आणि त्यांची मोफत कोविड 19 तपासणी करण्यात यावी अशी वार्ड क्रमांक 15 चे सक्रिय नगरसेवक तथा प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. रुग्ण सापडलेल्या इमारती त्वरित सील करण्या यावा ज्या सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तसेच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या इमारती त्वरित सिल करण्याची गरज आहे. अनेकदा त्यासाठी उशीर होतो ही वस्तुस्थिती आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब होतही असेल मात्र त्यामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. प्रशासनाने त्वरित या इमारती सील कराव्यात अशी, मागणी प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष व खांदा कॉलोनी वार्ड क्रमांक 15 चे नगरसेवक संजय भोपी यांनी केली आहे. 23 मार्चपासून लॉकडाऊ