रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फीवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. पालकांच्या आडून युवासेनेच्या काही पदाधिकार्यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आणि सामना या मुखपत्राच्या 10 मे 2020च्या अंकात दिलेली आहे. त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. युवासेनेचे कार्यकर्ते रूपेश पाटील व त्यांचे सहकारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांना 9 मे रोजी दुपारी भेटले व त्यांनी निवेदन दिले. त्याचा फोटोही ‘युवासेनेच्या दणक्यानंतर निर्णय मागे’ या आशयाखाली मिरविण्यात आला आहे. प्रत्यक्षात या तरुण मुलांना ’सीबीएसई स्कूल फीवाढीची प्रक्रिया काय असते’ याचा थांगपत्तासुद्धा नाही. महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी म्हणजेच 2018-19 आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षाची अगोदर ठरलेली फी 2020-21 वर्षाकरिता रिव्हाइज (नवीन फी) करण्यासाठी स्कूल सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर पीटीए कमिटीच्या मिटींगमध्ये