म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर..
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर देशात व राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात काही जिल्ह्यात शिथिल करण्यात आल्या असून तसेच रायगड जिल्ह्याचा ऑरेंज झोन मधे समावेश झाल्याने म्हसळा तालुक्यातील विविध सेवा सुरू होणार अशी माहिती नागरिकांमध्ये पसरली आहे. दि.4 मे ला लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्याने अनेक नागरिक संभ्रमात आहेत. बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू होणार आणि कडधान्य, भाजीपाला व मेडिकल सह अन्य सेवा सुविधा सुरू होणार अशी माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. दि.4 व 5 तारखेला म्हसळा बाजारपेठ मधील कडधान्य, भाजीपाला, मेडिकल सह इतर काही सेवा सुविधांची दुकाने उघडली गेली होती. त्यामुळे 17 मे पर्यत घोषित केलेल्या लॉकडाऊन काळात म्हसळा बाजारपेठ बंद राहणार की सुरू राहणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. तसेच स्थानिक म्हसळा नगरपंचायत बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार आहे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. म्हसळा तालुक्यातील बाजारपेठेत दोन दिवस गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून येत होते, नागरिक