कोरोना पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची तळा तालुक्याला भेट. जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना गावी परत पाठविण्याचे नियोजन.
(तळा श्रीकांत नांदगावकर) कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळा तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव,पो.नि. सुरेश गेंगजे,मुख्याधिकारी माधवी मडके,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवटकर व पत्रकार बांधव उपस्थित होते.लॉकडाऊन मुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील कामगार,मजूर व नागरीक रायगड जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठविण्यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करतात आतापर्यंत जवळपास साठ हजार मजुरांनी गावी परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत या मजुरांसाठी ज्यावेळी त्यांच्या राज्यातून आपल्याला परवानगी मिळेल त्यावेळी त्यांना आपण रेल्वेची सुविधा उपलब्ध करणार आहोत.आजपर्यंत तीन रेल्वेने आम्ही नागरिकांना मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये पाठविले आहे व आज रोजी दोन रेल्वे गाड्या आपण ओडिसा आणि मध्यप्रदेश साठी पाठविणार आहोत दि.१० रोजी झारखंड साठी रेल्वे सोडणार आहोत.तसेच रायगड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील जे मजूर