Posts

Showing posts from May 8, 2020

ब्रेकिंग न्यूज - संपूर्ण कामोठे  कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

Image
    पनवेल दि.०८ मे २०२० आयुक्त गणेश देशमुख यांचा मोठा निर्णय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. कामोठेचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. लोकसंख्या 1.13 लाख आहे. तसेच येथे आजअखेर 54 आहेत. एकूण महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत. त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती करण्यात येत असत परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.   सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील.

कोकण हापूस " पहिला मोबाईल  ॲप प्ले स्टोअर वर उद्यापासून उपलब्ध कोकण हापूसचे अत्याधुनिक डिजिटल मार्केटिंग देवगड रत्नागिरी केळशीचा  ओरिजनल हापूस आणि कर्नाटकचे  डुप्लिकेट हापूस

Image
            केमिकलचा, कार्बाइडचा वापर करून चार दिवसात आंबे पिकवणे, किंवा कर्नाटक चे हापूस सारखे दिसणारे डुप्लिकेट हापूस कोकणातल्या हापूस मध्ये मिक्स करणे, किंवा  कर्नाटक  आंबा देवगड रत्नागिरी हापूस म्हणून विकणे अशा गैरप्रकारांना मुळे मागील दहा पंधरा वर्ष कोकणातील हापूस बदनाम झाला. हापूसची ती जुनी जगप्रसिद्ध आंबट गोड चव,  घरभर पसरणारा सुगंध, आणि तो  केशरी रंग  सर्वच  हरवलं होतं.       पण करोना च्या या लॉकडाऊन मध्ये ग्लोबल कोकणने   एक उपक्रम राबवला  नैसर्गिक पद्धतीने गवताच पिकवलेला  हापुस आंबा  ग्लोबल कोकण हापूस या ब्रांड ने  थेट सोसायट्यांमध्ये घरोघरी दिला. अशाच स्वरूपाचे उपक्रम  कोकणातल्या शेतकऱ्यांनी आणि युवकांनी राबवले आणि त्यामुळे आंबा प्रेमी मुंबईकरांना पुणेकरांना हापूस ची जुनी  चव सापडली. जगात कोकणातल्या हापूस आंब्याला तोड नाही भारत सरकारने कोकणातल्या हापूसला जी आय मानांकन दिले आहे. त्यामुळे यापुढे केवळ कोकणातल्या हापूसला हापूस म्हणता येईल अशी कायद्याने तरतूद झाली. आणि कोकणवासियांनी यापुढे हा दर्जेदार हापुस थेट ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे.       यावर्षी कोकणभूमी प्रतिष्ठानने हाप