कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने लाॕकडाऊनमूळे बेरोजगार, हातावर पोट असणाऱ्या गरजू कुंटूंबांना अन्नधान्य स्वरुपात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
कास्ट्राईब संघटनेच्या शिक्षक बंधु भगिनी यांनी दानाचे आवाहन करुन कोरोना या महामारी मध्ये बेरोजगार उपाशीपोटी कुटुंब बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले (5 किलो तांदूळ,2 किलो गोडेतेल,2 किलो साखर,पाव किलो चहा पावडर,1किलो मुगडाळ,मिठपुडी, मसाला,) किटचे वाटप करण्यात आले संकटसमयी संघटनेच्या वतीने उचललेला मदतरुपी खारीचा वाटा गोरगरीब गरंजूच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करणारा होता. दिनांक 1 मे ते 3 मे दरम्यान कल्याण विठ्ठलवाडी, शहाड,अंबरनाथ, वांगणी, बदलापूर, उल्हासनगर,मुरबाड या ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप कोकणविभाग अध्यक्ष संतोष गाढे,ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राहुल हुंबरे,वंचित बहुजन आघाडीच्या महीला अध्यक्षा माया कांबळे,वांगणी-युवानेता नविन वाघमारे,मिलींद शिलवंत,प्रकाश वाघमारे, प्रसिध्दी प्रमुख योगेश येलवे,समता सैनिक दलाचे पदाधिकारी सुनिल भालेराव हे उपस्थित होते.या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोकण कार्याध्यक्ष दिनेश शिंदे,भिव...