Posts

Showing posts from May 2, 2020

मार्केटमधील गर्दीच्या नियोजनाकरिता व्यापारी प्रतिनिधींसोबत चर्चा

Image
    पनवेल(प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नाका ते टपाल नाक्यादरम्यानच्या मार्केट परिसरातील बेबंद गर्दीचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर आणि व्यापारी प्रतिनिधींची नुकतीच सविस्तर बैठक झाली. टपाल नाका ते उरण नाका परिसरातील गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. या गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे तसेच कोरोनासंदर्भामधील गंभीरता सर्वसामान्य लोकांना कळत नसल्यामुळे आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली, तसेच विभागनिहाय त्या त्या ठिकाणची मार्केट खुली करून लोकांनी आपापल्या विभागातीलच मार्केटमध्ये खरेदी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी बाळगण्यासाठी उपाययोजना करण्याचेही या वेळी ठरले.

समाजमाध्यमांवर अश्लाध्य पोस्ट टाकणाऱ्या  समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

Image
        पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाध्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (०१ मे) पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.           या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते.           कोरोनाच्या वैश्विक संकटातून बाहेर योण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करीत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमामध्ये काही ठराविक लोकांकडून असंसदीय शब्दात टिका होत आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्र पोस्ट करण्यात येत आहे. देवेंद्र फडण