1 मे 'रायगड मत'चा 12 वा वर्धापन दिन. 2009 ते 2020 - संघर्षाची 12 वर्षे
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यासारख्या दुर्गम भागातून एका सकलप कोंड या खेडेगावातून सुरु केलेले हे वर्तमानपत्र म्हणजे श्रीवर्धन मतदार संघाचा आणि रायगडच्या तमाम जनतेचे 'लोकमत' बनले आहे. अशा खेडेगावातून सुरुवात जिथे ना व्यवस्था आहे, ना रस्ते, ना धड वीज, ना रोजागार, ना कुठलेले आर्थिक स्तोत्र कमावण्याचे साधन? आजही इथल्या लोकांना पोटापाण्यासाठी मुंबईवरच अवलंबून राहावे लागते. आपल्या खेडेगावातील, तालुक्यातील तसेच दक्षिण रायगडच्या जनतेच्या समस्या प्रखरपणे मांडण्यासाठी 'रायगड मत'चा संपादक म्हणून मी जितेंद्र नटे गेली 12 वर्षे जिकरीचे प्रयत्न करीत आहे. 2009 साली इंटरनेट, सोयीसुविधा एवढ्या नव्हत्या. एवढेच काय न्यूजपेपर वर्तमानपत्रेही नव्हते. तसेच मोठ्या पेपरमध्ये खेडेगावातील बातम्या लागत नसत. कुणीही लक्ष देत नसे. अशा वेळी स्थानिकांचे प्रश्न सुटणार कसे? नवाकाळ, संध्याकाळ, इनमुंबईनगर, मुंबई लक्षदिप, सॅप मीडिया वर्ल्डवाईड, अद्वैत फीचर (न्यूज एंजसी), सॅफ्रान मीडिया अशा नामांकीत कंपनीत नोकरी मी केली होती. 2009 साली एशीयन फोटोग्राफी या मॅगझीन मध्ये काम करीत असतांना आपल्याकड