लॉक डाउन मध्ये दररोज हजारो गरजू लोकांना जेवण वाटप... एक हात मदतीचा..गरिबांना दिलासा
पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो लोकांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीमुळे मोलमजुरी करणाऱ्या नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून पनवेल परिसरातील १८ हजारहून अधिक कुटूंबांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे लॉक डाऊन वाढल्यानंतर हातावर पोट असलेल्या, मोलमजूर तसेच बेघर लोक अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्यावतीने 'मोदी भोजन कम्युनिटी किचन' च्या माध्यमातून खारघर, पनवेल, तक्का, कामोठे येथे दररोज किमान अडीच हजार लोकांना तयार जेवण प...