Posts

Showing posts from April 27, 2020

रायगड  विकास  सहकारी संस्था तथा भिमशक्ती कुलाबा तालुक्याच्या वतीने गरीब गरजू लोकांना धान्य वाटप

Image
      महेंद्र कांबळे - कुलाबा प्रतिनिधी - जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असून आपल्या सरकारने देखील या महामारी पासून जनतेच्या सुरक्षिते साठी लॉक डॉउन घोषित केले आहे त्या पासून लोकांना घरातच राहावे लागले आहे अशातच लोकाचे खिशातील पैसे व घरातील अन्न धान्य सपंत जाऊन उपासमारीची वेळ काही जणावर आली आहे अशा मध्ये आपल्या परीने प्रत्येकजण मदतीचा हात पुढे करत आहेत अशातच रायगड  विकास  सहकारी संस्था तथा भिमशक्ती कुलाबा तालुक्याचे   अध्यक्ष मंगेश भाऊ साळवी यांच्या कडून गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सुनील संतापे मंगेश शिंदे,सुनील हटवार, मंगेश पुजारी,महेंद्र हाटे, सुरेंद्र साळवी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते   रायगडचे लोकमत 'रायगड मत'  संपादक :- जितेंद्र नटे ✍️ बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :- 📲 8652654519 📲 9137595224 Email : raigadmat@gmail.com  🌍 Website : raigadmat.page  🎤 News Channel - News81रायगड मत  https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg

"यादव गवळी समाज" श्रीवर्धन विभाग संघटना यांसकडून समाजास अन्नधान्याचा घरपोच वाटप

Image
      श्रीवर्धन दि.२८, (राजू रिकामे) यादव गवळी समाज, विभागीय संघटना श्रीवर्धन यांच्यामार्फत गवळी समाजाच्या निगडी, सायगाव, वडघर, पांगलोली, जांभूळ, गालसुरे-काठी, गुळधे, गाणी या गावांमध्ये गवळी समाजाच्या घरा-घरामध्ये अन्नधान्यचा वाटप करण्यात आला व समाज बांधवांना कोरोना  या महामारी आजाराबद्दल कोणती काळजी घ्यावी व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले.                          कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे, श्रीवर्धन तालुक्यात गवळी समाज हा ग्रामीण भागात विखुरलेला असल्याने समाज्यातील कुटुंबांचे अन्नधान्यसाठी हाल होऊ नयेत समाजातील कुटुंब उपाशी न राहता प्रत्येकाला पोटभर अन्न मिळायला हवे म्हणून, एक सामाजिक कर्तव्य म्हणून कर्तव्यदक्ष अध्यक्ष मोहन लाड यांच्या कार्यप्रणालीत हा उपक्रम राबविण्यात आला, गवळी समाज, श्रीवर्धन विभागीय संघटना यांच्या मार्फ़त अन्नधान्य वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला.                       सदर अन्नधान्य वाटपसाठी अध्यक्ष मोहन लाड, उपाध्यक्ष सुनील दर्गे, उपाध्यक्ष पांडुरंग गायकर, सेक्रेटरी संदीप लाड (सर), सहसेक्रेटरी मोहन कांबळे, खजिनदार पांडुरंग

३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार - मुख्यमंत्री ...राष्ट्र कर्तव्य आणि संयमाबद्दल सर्वधर्मियांचे कौतुक

Image
      मुंबई दिनांक २६:    ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.    ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी  यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या,  मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी  अभिवादन ही केले. कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला  अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच  जीवनावश्यक वसतूंची वाहतूक सुरुच आहे.  कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा  प्रयत्न आपण करत आहोत  असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,

आमदार मनोहर भोईर यांच्याकडून १२००० च्यावर आदिवासी, निराधार गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वाटपाचे काम सुरूच  पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील ९० कुटुंबांनी घेतला लाभ  

Image
        कळंबोली/ प्रतिनिधी पनवेल प्रतिनिधी  कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या २४  पासून लॉकडाऊन सुरू आहे. 3 मे नंतरही  ही परिस्थिती किती बदलेल याबाबत शंका आहे  परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पनवेल उरण तालुक्यात आदिवासी बांधवां बरोबर निराधार , झोपडपट्टीवासी , गरीब गरजू यांचे प्रमाण जास्त आहे  हातावर पोट भरणा-या आदिवासी बांधवाना एक वेळचे जेवण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.  त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पर्यत असा १२००० च्यावर आदिवासी  गरीब निराधार नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री मा. आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाने त्यांच्यावर सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे    कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. त्या विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. ही मुदत शासनाने आणखी 3 मे पर्यंत वाढवली आहे. शासन व प्रशासनाच्चा आदेशाचे पालन करताना प्रत्येकांनी आपल्याला सुरक्षित म्हणून घरात बंद