Posts

Showing posts from April 26, 2020

चिंचपाडा येथील भराव काढल्याने पनवेल शहराला पुराचा धोका कमी

Image
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पूलाखालील  भराव काढण्यात आल्याने या वर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली.                पनवेल शहरात मागील वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात  गाढी नदीचे पाणी पनवेल शहरातील साई नगर ,बावन्न बंगला ( दि .बा. पाटील नगर ) , पटेल मोहल्ला खाडी,वीट सेंटर ,कोळीवाडा भागात 5-8 फुट पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चिंचपाडा भागात गाढी नदीवरील पूलाखाली मातीचा भराव असल्याने पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पुर सदृश्य स्थिति निर्माण झाल्याचे लक्षात आले होते.               या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही परिस्थिति शासनाच्या लक्षात आणून दिली होती. कोरोंनाच्या लॉक डाऊन काळात शहरात आणि महामार्गावर रस्त्याची आणि पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या जोरात ...

आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची मदत 

    पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब  नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.               त्या अनुषंगाने पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटीजवळ 'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यत ३०० गरीब गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. लॉककडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मागर्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आज आमदार प्रशांत ठाकूर...

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने महापालिका क्षेत्रात अन्नछत्र  

  पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.          आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या अन्नछत्राला भेट देऊन गरजूंना जेवण वाटप केले. पनवेल महापालिका क् षेत्रात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले असून याबद्दल  भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे  केल्या जाणाऱ्या या कामाचे कौतुक केले तसेच अन्नछत्राला जागा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. लॉक डाऊन संपेपर्यंत हे अन...