Posts

Showing posts from April 25, 2020

नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक  पोलिस आयुक्तपदी विनोद चव्हाण यांनी पदभार स्वीकारला

        पनवेल: पनवेल पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असताना बढती मिळालेले विनोद चव्हाण यांची नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला. विशेष शाखेचे पोलिस आयुक्त गोवेकर यांची बदली पुण्यात झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी चव्हाण यांनी पदभार घेतला. चव्हाण यांना मुंबई रेल्वे विभागात बढतीनंतर बदली देण्यात आली होती. तिथे त्यांनी काही महिने काम केल्यावर राज्य शासनाच्या गृहखात्याकडून त्यांना नवी मुंबईत पाठवण्यात आले आहेत. 2020 मध्ये चव्हाण या पदावरून निवृत्त होतील. पोलिस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलिस आयुक्त असा त्यांच्या कार्याची चढता आलेख कौतुकास्पद राहिला आहे.

शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्यांना प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी… - आ. अनिकेतभाई तटकरे यांची शासन व प्रशासनाला विनंती…

Image
  रायगड : (प्रतिनिधी) सामाजिक जाणिवा जागृत असलेले कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडचणीत असलेल्या लोकांना सातत्याने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असुन आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मदत मिळाली आहे. ज्या लोकांकडे शिधापत्रिका नाही अशा शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्या लोकांसाठी शासन व प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आ. अनिकेतभाई तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी निधि चौधरी यांना केली आहे.  गेला महिनाभर सामर्थ्याने, जिद्दीने करोनाच्या संकटाला सर्वजण तोंड देत आहेत विशेषत: मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनी धैर्याने, सबुरीने प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यांच्या संयमाचे व धैर्याचे  आ.अनिकेतभाई तटकरे यांनी विशेष कौतुक केले असुन त्यांच्यापैकी अनेक जणांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने बऱ्याच जणांकडे आर्थिक संकट ओढावले असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली  आहे  . रेशनकार्ड जवळ नसलेल्या, शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या चाकरमानी