Posts

Showing posts from April 24, 2020

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणने पकडलेल्या चालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

      संपर्कात आलेल्या पोलिसांना केले क्वारंटाईन लॉकडाऊनमध्ये वरळी येथील कुटुंबाला कारने आणले होते श्रीवर्धनमध्ये रायगड पोलीस दलात खळबळ; रायगडकरांची चिंता वाढली अलिबाग । लॉक डाऊन असताना वरळी येथील कुटुंबाला कारने श्रीवर्धनमध्ये घेऊन आलेल्या चालकाला अटक करायला गेलेल्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. अटक केलेल्या वाहनचालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली आहे.  श्रीवर्धनमध्ये भोस्ते गावात कोरोना पॉझिटीव्ह सापडलेले पाच जणांचे कुटुंब हे लॉक डाऊन असताना एका कारने वरळीहून श्रीवर्धनमध्ये आले होते. त्यामुळे दक्षिण रायगडात खळबळ उडाली होती. तसेच लॉकडाऊन असताना हे लोक कारने आलेच कसे? याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. प्रशासकीय यंत्रणेलाही ही बाब काळजीत टाकणारी होती. या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जमीन शेख यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकावर या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली. या

कोरोना चा पार्श्वभूमीवर, मुंबई दुरदर्शन  केन्द्रा मध्ये हंगामी कर्मचार्यांचे वेतन मिळणे बाबद अतिरिक्त अधिकारी यांच्याकडे केली  मागणी

        मुंबई वरळी (महेश कदम  प्रतिनिधी) - गेले काही दिवस कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असलेल्या संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  एवढा मोठा कोरोनाचा संकट अख्ख्या जगात पसरला असताना आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब  वारंवार जनतेच्या सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आव्हान करीत आहेत.  शासनाचे पालन करा, लोकांना त्यांचे वेतन दिले जाईल. परंतु अशा परिस्थिती मध्ये ही  दूरदर्शन चे अधिकाऱ्यांनी जे कामावार आले अाहेत त्यांना वेतन देऊ आणि जे अशा  परिस्थिती येऊ शकले नाहीत त्यांचा  वेतन न देण्याची भूमिका करत आहेत  १५० कर्मचार्यांपैकी ५०% हंगामी कर्मचारी हे वरळी विभागात राहतात जो विभाग पालिकेने रेड झोन म्हणून घोषित केले आहे आणि काही भाग सील करण्यात आले होते, असे असतानाही वेतन न मिळण्याच्या भीतीने ज्यांना शक्य होते ते कर्मचारी ऑफिस चे काम थांबू नये म्हणून कामावर जात होते. हंगामी कर्मचाऱ्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा नसताना  १५,००० वेतनासाठी जीवाला धोका पत्करत कामावर जात होते.  परंतु जे ट्रेन व बस ने प्रवास करतात, ज्यांचे व

रिक्षा चालकांना मदत..! कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊन परिस्थिती पाहता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व गव्हाण ग्रामपंचायत यांच्या वतीने गव्हाण विभागातील रिक्षाचालकांना जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.

Image
        पनवेल (प्रतिनिधी) - सद्य परिस्थितीत कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन स्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब गरजूंना जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या लॉक डाऊन परिस्थितीची सर्वाना झळ बसली आहे, त्यात दररोजच्या धंद्यावर जगणाऱ्या रिक्षाचालकही चिंतेत बुडला आहे. त्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाण विभागातील रिक्षाचालकांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. जय बजरंग क्रीडा मैदानात या वस्तूंचे वाटप करताना अनंताशेठ ठाकूर, ग्रामपंचायत विजय घरत, भाऊ भगत, माई भोईर, सुधीर ठाकूर, रोशन म्हात्रे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.  

कामगारांना परत पाठवण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या -आमदार प्रशांत ठाकूर

Image
    पनवेल (प्रतिनिधी) कुशल आणि अकुशल कामगारांना महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात परत पाठवण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रातच काम उपलब्ध करून दिल्यास राज्याचा महसूल वाढेल, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या कुशल वा अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या कामगारांकडे काम उरले नाही. अशा परिस्थितीत या कामगारांना त्यांच्या मूळ  राज्यात परत पाठविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांची जबाबदारी झटकण्यासारखे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.          पुन्हा काम मिळेल या आशेवर अनेक कामगार अजूनही महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने राज्य सरकारने कोरोनावर मात करून त्यांना  काम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी राज्य सरकारने काम उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.           महाराष्ट्रात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशी जिल्ह्यांची वैद्यकीयदृष्ट्या

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना  महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरवा  - सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी  

Image
            पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.             या संदर्भात त्यांनी लेखी निवेदनही दिले असून यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.          सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सातत्याने स्वच्छतेचे आवाहन केले जात असुन, सध्या कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणणे करीता संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. ३ मे २०२० पर्यंत 'India Lockdown' च्या ह्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्यासाठी व कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वर्गासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे. कामधंदा बंद असल्यामुळे व हॉटेल् आणि खानावळ बंद असल्या

माणगाव तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेतर्फे करोनाग्रस्तांना तीन लाखाची मदत

Image
      श्रीवर्धन सोपान निंबरे; संपूर्ण जगासह देशात व राज्यात धुमाकूळ घातलेल्या करोना व्हायरसने जगाचीच परिस्थिती बिकट केली असून परिस्थिती ठंप्प पडल्याचे दिसत आहे.रायगड जिल्हा रेशनिंग रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने यावेळी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत धान्य दुकानदारांना महिन्याचा मिळणारा पाॅस रिबेट हा प्रतिक्विंटल १५० रूपये ईतका असतो त्यामुळे जिल्ह्यात १३६९ दुकानदारांना मिळणारा धान्याचा साठा ८००० मेट्रिक टन इतका आहे. सबंध जिल्ह्यात एकूण दुकानदारांना मिळणारा रिबेट हा  जवळपास एक कोटीहून अधिक असल्याने रायगड जिल्हा मुख्याधिकारी यांच्यामार्फत करोनाग्रस्त पिडीतांसाठी मुख्यमंन्त्री सहाय्यक निधीला १ कोटीहून अधिक रक्कम जमा करणार असल्याचे रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी जाहिर केले होते यांतील माणगाव तालुक्यांतील असलेला रिबेट हा जवळपास तीन लाख जमा करून तो आमदार भरत गोगावले, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तहसीलदार प्रियांका अहिरे यांच्या उपस्थितीत रेशनिंग धान्य जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्याकडे तीन लाखाचा चेक सुपुर्द क