Posts

Showing posts from April 23, 2020

दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई

Image
        सर्फराज दर्जी-बोर्ली पंचतन सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊनचे आदेश आहेत आणि सर्व प्रकारचे  देशी विदेशी दारु दुकाने व बिअर बार बंद असल्याने आणि मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई व उपनगरातून आले आहेत, त्यामुळे गावठी हातभट्टी दारुचे अड्डे विविध गावात काही ठिकाणी चालू असल्याचे समजते. *दिघी सागरी पोलीस* ठाण्याच्या हद्दीत  दिनांक २१/०४/२०२० रोजी दुपारी ३ च्या सुमारास  वडवली ते दिवेआगर जाणा-या अंतर्गत रस्त्यावर *एम.एच.०१.जी.ए.७५९३* या नंबर च्या सँट्रो कार मध्ये गावठी दारूची वाहतुक होत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *महेंद्र शेलार* यांना ‌समजले , माहिती मिळताच पोलिस सहाय्यक निरीक्षक *महेंद्र शेलार* ताबडतोब *पोलीस नाईक संदिप चव्हाण ,पोलीस हवालदार शेडगे, जागडे, प्रकाश सुर्वे* यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन वडवली ते दिवेआगर जाणा-या अंतर्गत रस्त्यावर *विजय विनायक वाणी(वय४५) व जगदिश केशव शिरवटकर* नावांचे दोन माणसे कोणत्याही प्रकारचा शासनाचा परवाना नसताना ते *एम.एच.०१.जी.ए.७५९३* सँट्रो कार मध्ये गावठी दारूची वाहतुक करत असल्या

ऊदानी फाउंडेशन कडून पनवेल येथे एक हजार शंभर गरजू गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Image
       पनवेल (प्रतिनिधी )कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता शासनाने लाॅकडावून जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अनेक उद्योगधंदे ,कामकाज ठप्प झाले आहे यातच हातावर पोट असलेले कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार, छोटे-मोठे व्यवसायिक यांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक जणांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे,  नवी मुंबईतील  यु .एस .आर. ग्रुपचे व ऊदानी फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील एक हजार शंभर  गरीब ,गरजू कष्टकरी कामगार ,नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती उदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहा उदानी यांनी दिली आहे .पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत साडेसातशे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.    लाॅकडाऊन मुळे अनेक जणांची उपासमार होत आहे.  शासनाने लाॅकडाऊन  घोषित केल्यापासून ऊदानी फाउंडेशन, कॉन्शियस सिटीझन फोरम, दत्त मंदिर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ, सीबीडी येथे कम्युनिटी  किचन सुरू करण्यात आले असून सुमारे 6000 जेवणाचे