Posts

Showing posts from April 22, 2020

फोटोग्राफरचे आयुष्यच लॉक डाऊनच्या मार्गावर आहे : जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांची खंत

Image
      श्रीवर्धन,२१ एप्रिल ( राजू रिकामे ) : कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जगाची अवस्था बिकट झाली आहे. लॉक डाऊन हा एकच पर्याय असल्याने भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झालेत. यामुळे फोटोग्राफी सह त्यावर अवलंबुन असणारे पुरक व्यवसाय पुर्णतः कोलमडला आहेत. फोटोग्राफी व्यवसायाच्या वाईट दिवसांना सुरुवात झाली असुन आगामी काळात फोटोग्राफरचे आयुष्य पुर्णतः लॉक डाऊनच्या मार्गावर आहे. यामधे आत्तापर्यंत सरकारकडून कोणते व्यवसाय चालू व कोणते नाही हे सांगतांना त्यामधे फोटोग्राफी हया व्यवसायाचा कुठेही उल्लेख नाही ही खंत रायगड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष विवेक सुभेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना विवेक सुभेकर म्हणाले की, दहा वर्षापुर्वी प्रत्येक कार्यक्रमास फोटोग्राफरची आवश्यकता असायची. त्यामुळे यामध्ये पैसा व प्रसिद्धी होती. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायात उतरले. रायगड जिल्ह्यात जवळपास दिड हजारावर छोटेमोठे फोटोग्राफर आपली उपजिवीका करीत आहेत. परंतू मोबाईल जमाना आला अन् फोटोग्राफर हळूहळू पडदयामागे जावू लागलाय. मोबाईलला चांगल्या दर्जाचा कॅमेरा आल्याने व विवीध अॅप या

पोलीस व पत्रकारांच्या कोरोना टेस्ट मोफत करण्याचे तसेच पत्रकारांना  जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी 

Image
      पनवेल : राज भंडारी  कोरोना महामारीमुळे वैद्यकीय सेवा, नगरविकास खात्यांतर्गत असणाऱ्या आस्थापना यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उभे राहून नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी झटत आहेत, तर पत्रकार बांधवही विविध ताज्या बातम्या घरी बसलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. मात्र स्वतःची काळजी घेत असतानाही त्यांनाही बाहेर फिरण्याची मनात असलेली भीती नष्ट होण्यासाठी शासनाच्यावतीने १५ दिवसातून कोव्हीड - १९ म्हणजेच कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांना PPE किट आणि जीवनावश्यक वस्तू देखील पुरविण्यात याव्यात यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच तत्कालीन कळंबोली ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र भगत यांनी ई -मेल द्वारे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, पालिका आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे केली आहे.   यावेळी रवींद्र भगत यांच्या मागणीमध्ये एक मुद्दा त्यांनी आवर्जून उल्लेखलेला आहे, तो म्हणजे पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरविण्याची

प्रवेश बंदीमध्ये घुसणाऱ्या रिक्षा चालकावर पनवेल शहर पोलीसांची धडक कारवाई ..नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज 

Image
    पनवेल : राज भंडारी  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचे कारण देत नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करीत असल्याचे विदारक सत्य समोर असल्यामुळे ही गर्दी पांगविण्यासाठी पर्यायाने कमी करण्यासाठी उरण नाका परिसरालगतच्या रस्त्यांना एकमार्गी (वन वे) चे स्वरूप देण्यात आले आहे. मात्र काही आडमुठ्या प्रकाराची मानसिकता असलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे हॉटेल पंचरत्न येथील चौकात समोर आले आहे. उरण नाका येथून टपाल नाका आणि तेथून बाहेर पाडण्यासाठी हॉटेल पंचरत्न येथील चौक अशी मार्गिका पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आखलेली आहे. यावेळी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी वाहन फिरविण्याचा सूचना दिल्या असतानाही मी इथूनच जाणार असा अट्टाहास या रिक्षाचालकाने करून गोंधळ माजविला. यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस हवालदार किरण सोनावणे यांच्याशी उद्धट वर्तन करून या रिक्षाचालकाने पोलिसांनाही न जुमानता विरुद्ध दिशेने आपली रिक्षा क्रमांक (एमएच ४६ एसी ७७०७) ही पोलिसांच्या समक्षच पळविली. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग केला. यावेळी मुसलमान न

कोरोना वायरसमुळे वैश्विक महामारी सुरू झाल्यामुळे भारताने लॉक डाउन घोषित केल्यापासून घरोघरी आणि सर्व परिसरात नगरसेवक स्वप्निल बांदेकर साहेब, तसेच कार्यसम्राट सिध्दार्थ मोरे आणि सहकारी यांच्या वरीने सॅनेटायझर फवारणी सुरू

Image
      महेंद्र कांबळे - (मुंबई प्रतिनिधी) आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य, देशातच नव्हे तर जगात थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणू च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक  स्वप्निल बांदेकर साहेब, तसेच कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्मा. सिध्दार्थ मोरे तसेच इतरही पदाधिकारी शिवसैनिक युवा सेना, यांच्या प्रयत्नांने व मेहनतीने शासकीय नियमांचे पालन करत सोशल डीस्डनसींग ठेवून.गर्दी न करता आज गुरु माऊली अपार्टमेंट, व सागर अपार्टमेंट व इतर आजुबाजुच्या परीतसरा मध्ये सॅनेटाइजर औषध फवारणी करण्यात आली.       हे कार्य लाँकडाउन सुरु झाल्या पासून पुर्ण विभागात रोज सकाळी चालू आहे. बांदेकर साहेब आणि त्यांचे सहकारी करोना वायरस च्या या पाश्वभूमी वर सामान्य लोकांची आरोग्या विषयाची परीस्थीती लक्षात घेऊन अशा संकटकाळी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता समाज कार्य खरोखरच कौतुकास्पद व वाखण्याजोगं आहे.

गोरगरिबांना जेवण किंवा अन्नधान्य नगरसेवक निधीतून द्या माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचे आयुक्तांना पत्र

Image
    पनवेल(प्रतिनिधी)  कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. 3 मे नंतरही  ही परिस्थिती किती बदलेल याबाबत कोणताही अंदाज वर्तवता येत नाही. परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून रोडपाली परिसरात अशाप्रकारे हजारो कामगार राहतात. त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना दोन वेळचे जेवण किंवा अन्नधान्य पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आपला नगरसेवक निधी त्यासाठी खर्च करण्यात यावा असा प्रस्ताव महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना  दिला आहे. याबाबत माणुसकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. त्या विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. ही मुदत शासनाने आणखी 13 मे पर्यंत वाढवली आहे. दरम्यान त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. व्यवसायिक, कारखानदार, चाकरमानी, वाहतूकदार यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडले आहेत. त्याचब

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य द्या  - आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी 

Image
        पनवेल(प्रतिनिधी) रायगड जिल्हयातील व विशेषतत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनाही दिले आहे. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.          आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील निरनिराळया विकामकामांच्या निमित्ताने तसेच उद्योगधंद्यांच्या निमित्ताने देशातील निरनिराळया राज्यातून व महाराष्ट्राच्या निरनिराळया भागातून अनेक लोक गामीण व शहरी भागात रहात आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार बंद झाला आहे. शासकीय अधिकार्यांकडून प्राप्त माहितीनुसार ही संख्या १ लाख ५० हजारच्या आसपास आहे.           लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या सर्व लोकांची उपासमार

कोविड-19 विरोधातील लढ्यात ‘एपीएम टर्मिनल’ही सामील

Image
      उरण (प्रतिनिधी):  सरकारने 25 मार्च 2020 पासून टाळेबंदी जाहीर केल्यानंतर, गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘एपीएम टर्मिनल्स मुंबई’ने आपल्या ‘टर्मिनल’वरील कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली आहेत. हे टर्मिनल न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) येथे कार्यरत असलेल्या पाच कंटेनर टर्मिनल्सपैकी एक आहे.   बंदरात प्रवेश करणारे कर्मचारी व अभ्यागत, या सर्वांचे तपमान घेणे व इतर तपासणी ‘एपीएम टर्मिनल्स मुंबई’ने अगदी प्रथमपासून सुरू केली. ‘कोविड-19’चा फैलाव होऊ नये म्हणून बंदरात वावरणाऱ्या सर्वांना सामाजिक अंतर ठेवणे, नियमितपणे हात स्वच्छ करणे, संरक्षणात्मक मास्क घालणे आदी बंधने घालण्यात आली.  खबरदारी म्हणून सर्व सार्वजनिक क्षेत्रे बंद करण्यात आली. गर्दी कमी करण्यासाठी कॅन्टीनमध्ये पॅकिंगच्या स्वरुपातील भोजन दिले गेले आणि तेथेही सामाजिक अंतराचे नियम लागू करण्यात आले. टर्मिनलवर संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरणासाठी एक निर्जंतुकीकरण बोगदा व ‘शू सॅनिटायझेशन कियॉस्क’देखील स्थापित करण्यात आला. टाऴेबंदीची स्थिती पाहता, बंदरात दूरवरून येणाऱ्या