Posts

Showing posts from April 21, 2020

बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली १२९ वी भीमजयंती

Image
    महेंन्द्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी - विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत  बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप मधील ग्रामीण रुग्णालय येथे " व्हेन्टिलेटर सुविधा " उपलब्ध व्हावी म्हणून एक भरीव रक्कम ५०,०००/-रु.चा पहिला हफ्ता आज दि.२१/०४/२०२० मुख्यमंञी महोदयांना याबाबतचे निवेदन व धनादेश रक्कम बदलापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सारीपूञ साहेब यांच्या उपस्थितीत बदलापूरचे नगराध्यक्ष अॕड.प्रियेश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अरुण केदारे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे बदलापूर शहराचे नेते दिलीपशेठ पवार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष आनंद सोनकांबळे सर,युवा कार्यकर्ते राहुल केदारे हे उपस्थित होते

नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा आता मुंबईत आपल्या सोसायटीमध्ये

Image
      सिद्ध हापूस आंबा आता मुंबईत आपल्या सोसायटीमध्ये ·          देवगड, राजापूर, विजयदुर्ग, पावस, गणपतीपुळे, जकादेवी, दापोली, केळशी, गुहागर, श्रीवर्धन अशा कोकण पट्ट्यातील १०,००० डझनपेक्षा जास्त आंबे वितरित ·         जीआय मान्यताप्राप्त जगातील सर्वोत्तम फळाचा ब्रँड "ग्लोबल कोकण अल्फांसो "   मुंबई १८  एप्रिल २०२० : हापूस आंबा ही कोकणची मुख्य अर्थव्यवस्था आहे . कोकणातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे हापूस आंबा.. वर्षभर शेतकरी आपल्या बागेत प्रचंड कष्ट करतात आणि वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. हापूस आंब्याचा मुख्य सीजन एप्रिल आणि मे असतो यंदा याच कालावधीमध्ये “कोरोना वायरस” एक जागतिक संकट आले आहे. कोकणातील आंबा बागायतदार यामुळे असंख्य अडचणींना तोंड देत आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी  विभाग या  सर्व यंत्रणा आपापल्या परीने शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत छोटी धडपड म्हणून कोकण भूमी प्रतिष्ठानने  एक अभिनव संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. यात समन्वयाचे काम कोकण भूमी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मास्क लाव

नामांकित 'एज्युकेशन वर्ल्ड' ची टॉप रँकिंग यादी जाहीर ,भारतात पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा पहिल्या शंभरमध्ये समावेश 

Image
      पनवेल(प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयास देशात ६९ वे तर राज्यात २१ वे रँकिंग प्राप्त झाले आहे.  राष्ट्रीय स्तरावरील 'एज्युकेशन वर्ल्ड' या मासिकाने एप्रिल २०२० च्या विशेषांकामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील भारतातील खाजगी स्वायत्त महाविद्यालयांध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर स्वायत्त कॉलेज या महाविद्यालयाचा समावेशझाला आहे. या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तसेच मुंबई विद्यापीठाने स्वायत्तता बहाल केली असून अत्यंत अल्पावधीमध्ये चांगू काना ठाकूर कॉलेजने खूप मोठे यश प्राप्त केले आहे. भारतामध्ये ७४७ स्वायत्त महाविद्यालये आहेत. 'एज्युकेशन वर्ल्ड' ने चांगू काना  ठाकूर  महाविद्यालयाला अर्थात सी. के. टी. कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील ६९ वे आणि राज्यस्तरावरील २१ वे क्रमांकाचे रँकींग दिले आ

कोविड-१९विरोधातील लढ्यामध्ये लोकांच्या मदतीसाठी टाटा स्टील बीएसएलच्या स्वयंसेवकांकडून खोपोलीत मदतीचे सरसावले हात

Image
        पनवेल(प्रतिनिधी) आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड-१९ चा प्रभाव भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये पसरत आहे. त्या अनुषंगाने  रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील टाटा स्टील बीएसएल प्लांटच्या हौसिंग कॉलोनीतील स्वयंसेवक आजूबाजूच्या स्थानिक समुदायातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.   कंपनीच्या हौसिंग कॉलोनीतील  ' क्रिएटिव्ह सोल्स '  लेडीज क्लबच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या ,  रेशन कार्ड नसलेल्या स्थलांतरित कामगार आणि आदिवासी कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले आहे. स्थानिक प्रशासन आणि दोन ग्राम पंचायतींनी या दिशेने आधीच सुरु केलेल्या मदतकार्याला हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे.  कंपनीच्या प्लांटच्या जवळ असलेल्या बीड जांभरूळ वस्तीतील जवळपास १५० आदिवासी कुटुंबांना धान्य देण्यात आले आहे.  याशिवाय प्लांटमधील स्वयंसेवकांनी आतापर्यंत जवळपास २६०० मास्क्सचे देखील वाटप केले आहे.  हे मास्क्स क्लबच्या २२ सदस्यांनी तयार केले आहेत.   वरील मदतकार्याच्या बरोबरीनेच आशा ,  एएनएम आणि प्रत्यक