Posts

Showing posts from April 20, 2020

कोरोना व लॉक डाऊनच्या पार्श्र्वभूमीवर यापुढेही जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे                          स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या                                   - आमदार प्रशांत ठाकूर 

Image
      पनवेल (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जनतेने एक दिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी  पुढाकार घेतला आहे.तशा प्रकारचे सहकार्य सध्या सुरु असलेल्या लाँकडाउनच्या काळात ही करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघासह रायगडच्या जनतेला केले आहे.         जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्या देशातही कोरोनाला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु आहे. देशात, राज्यात आणि आपल्या पनवेल व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे यासाठी गर्दीच्या जागी जाणे टाळा, मास्क, सेनिटायझर वापरा,  हात वारंवार साबणाने धुवा, स्वच्छता राखा असे सांगून शासनाला सहकार्य करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा केले आहे.           पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपली ड्युटी लाँकडाउनच्या काळातही अविरत सुरू ठेवली आहे. तसेच तालुक्यातील भाजप

रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीची मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे मागणी

Image
    प्रतिनिधी:- रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीने मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे मागणी केली आहे.दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 25/04/2020 पासून मुस्लिम धर्मियांचा रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे.रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव अजाननुसार सहेरी,इफ्तार व तराविह नामजाचे पठण करतात.परंतु भारत सरकारच्या प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व आदर करतो पण मुस्लिम धर्मात रमजान या पवित्र महिन्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची मुभा लॉकडाउन काळात देण्यात यावी.त्यामुळे रमजानच्या काळात मुस्लिम बांधवाना धार्मिक कार्यासाठी मदत होईल.अशी मागणी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीने मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे पत्र पाठवून केली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी,सचिव अफ्रोज सय्यद यांनी दिली.