Posts

Showing posts from April 18, 2020

तळोजामध्ये गरजूंना शिवभोजनच्या माध्यमातून मोफत अन्नदान  शिवसेना जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम 

Image
      पनवेल : राज भंडारी  कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता केंद्र शासनासह राज्य सरकारने लॉक डाऊनचा कालावधी वाढविला आहे. पर्यायाने हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. एका बाजूला रेशनकार्ड धारकांना सरकार रेशन उपलब्ध करून देत आहे तर ज्यांची रेशन कार्डच परराज्यातील अथवा परगावातील आहेत, अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी तळोजा परिसरातील गरजूंना अन्नधान्य देण्याची धुरा पार पाडल्यानंतर गेल्या १६ दिवसांपासून ते येथील ७०० ते ८०० गरजूंपर्यंत शिजविलेले अन्न शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.  यावेळी तळोजा येथील शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांच्या बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार उडविला असून जागतिक पातळीवरील अमेरिका, ब्रिटन, फ्रांस आदी देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या दीड महिन्यापासून भारतातही या विषाणूने डोके वर काढले असून संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा १४ हजारांच्या आसपास

खांदा वसाहत, खारघर, कामोठे आणि नेरे येथे चार कोरोना रुग्ण सापडले

Image
      पनवेल, दि.१८ (वार्ताहर) :   पनवेल परिसरात कोरोना एक प्रकारे फोफवताना दिसत आहे. शनिवारी खांदा वसाहत, कामोठे, खारघर आणि नेरे येथे प्रत्येकी एक असे पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे पनवेलकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नेरे पट्ट्यात कोरोना पोचल्याने ग्रामीण भागातही आता सावधानगी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कामोठे वसाहतीत सापडलेला रुग्ण हा ताज हॉटेलमध्ये शेफचे काम करत होता. या हॉटेलमध्ये संक्रमित अन्य ८ व्यक्तीबरोबर यांचाही समावेश आहे . सध्या ती व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . खांदा कॉलनी येथील ८४ वर्षाच्या एका महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. संबंधित रुग्ण किडनी व निमोनिया अशा दुर्दम्य आजारापासून गेल्या २ वर्षापासून ग्रस्त आहेत . या महिलेला पनवेल उपजिल्हा रूग्णालय दाखल करण्यात आले होते परंतु पुढील उपचारासाठी त्यांना एम . जी . एम . रूग्णालय , कामोठे येथे स्थलांतरीत केले आहे . खारघर येथील सेक्टर २० मधील १ व्यक्तो कॉव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती १७ मार्च २०२० पासून डी . वाय . पाटील हॉस्पीटल , नवी मुंबई

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरात कोरोनाची पहिली रुग्ण निष्पन्न

Image
      प्रतिनिधी : पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका वृध्द जोडप्यापैकी महिलेला तीन दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविण्यात आल्यानंतर कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम हा परिसर तातडीने सील करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांच्यावतीने त्यांचे पती आणि पोलीस सील करण्यात आलेल्या प्रभातनगर परिसरामध्ये तळ ठोकून बसलेले दिसले. पोलादपूर पोलिसांनी श्रीकाळभैरवनाथ देवस्थान परिसरांमध्ये सावलीत तळ ठोकलेला दिसून आला. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशी केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांनी सदर महिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यासाठी महाड शहरातील खाजगी रुग्णालयांमधून रवाना झाली तेथे तिच्या मुलाने भांडूप मुंबई येथील निवास स्थानाचा पत्ता दिल्याने पोलादपूरमधून रवाना झालेल्या महिलेबाबत अधिक माहिती मिळण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला अडचण निर्माण झाली.  पोलादपूर तालुक्यात त्यांच्यावर बंदी काळामध्ये 9140 चाकरमानी विविध

श्रीवर्धनमध्ये  साईनाथ बियरशॉपवर पोलिसांचा छापा  :  लॉकडाऊन संचारबंदीत  अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तीन आरोपी सह २००४०० मुद्देमाल जप्त 

Image
        श्रीवर्धन; (सोपान निंबरे/ राजू रिकामे) कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा संसर्ग संक्रमण साखळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन संचारबंदी  मध्ये जीवनावश्यक वस्तूं दुकाने वगळता       बियरशॉप, वाईनशॉप, बार,परमिट रूम सर्वप्रकारची देशी विदेशी मद्य व इत्यार्दी सर्व विक्रीवर शासनाने निर्बंध घातलेला असतांना     श्रीवर्धन शहरामध्ये श्रीसाईनाथ बार येथे अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड  यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व  श्रीवर्धन पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने  दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी श्रीसाईनाथ बार वर छापा कारवाई करण्यात आली आहे. त्यावेळी तीन आरोपींना विदेशी दारूची वाहतूक व विक्री करत असतांना अटक करून गु. र. क्र.१०/२०२० कलम ६५ खंड (ई) ८३ दारू बंदी कायद्यासह भा. द. वि. १८८ अन्वये गुन्हा नोंद केला असून श्रीसाईनाथ बारमधील २००४०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास psp खिरड करीत आहेत. श्रीवर्धनमध्ये आठ दिवसात अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्रेत्या दोन बारवर छापाकारवा