कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर यापुढेही जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे- आमदार महेश बालदी
उरण दि १७( वार्ताहर ) कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने एक दिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.तशा प्रकारच सहकार्य लाँकडाउनच्या पुढील काळात ही करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरणच्या जनतेला केले आहे. मुंबई, नवीमुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्या नंतर या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणच्या जनतेने घाबरून न जाता कोरोनाला आपल्या वेशीवर रोखून ठेवण्यासाठी एक दिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपली ड्युटी लाँकडाउनच्या काळातही अविरत सुरू ठेवली आहे. तसेच तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी आदिवासी,भटक्या नागरीकांना आणि परिसरातील मोल मंजुरी करणाऱ्या कामगारांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे आणि मास्क,सनिटायझर,सह इतर मेडिकल साहित्याचे वाटप करण्यासाठी कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता पुढाकार आहे.अशा माझ्या जनतेचा निश्चित मला त्यांचा सेवक म्हणून अभिमान वाटत आहे. तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र म