राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत ३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई
पनवेल : राज भंडारी पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असून त्यामाध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर दंडात्मक महसूल उपलब्ध होत आहे. पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामीण पनवेल उत्पादन शुल्क विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लॉक डाऊनच्या काळात म्हणजेच अवघ्या २२ दिवसात तब्बल ६६ कारवाया करून ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल अवैध मद्यसाठा हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यावेळी एकूण ३४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कविभाग हा महाराष्ट्रात सर्वाधिक महसूल मिळवून देणारा असा विभाग असून या विभागाचे ब्रीदच संवर्धन करणारे आहे. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असे ब्रीद घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून महाराष्ट्रातून जवळपास २० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. बऱ्याच वेळेला प्रस