Posts

Showing posts from April 15, 2020

लॉकडाऊन मध्ये काय सुरु? काय बंध?

Image
  २० एप्रिल पासून किराणामालाचं दुकान, रेशनचं दुकान, फळ, भाज्या, मांस-मच्छी, पोल्ट्री, खाद्यान्न, डेअरी, दुधाची केंद्र आणि गुरांच्या खाद्यान्नाची दुकानं सुरू • ग्रामीण भागात सुरू होणार कारखाने. • शेतकऱ्यांना दिलासा. • बँक, पेट्रोल पंप सुरू. • आयटी सेक्टर सुरु. • शाळा महाविद्यालये बंद. • रस्ते निर्मितीला सुरु. • फार्मा इंडस्ट्रीला सुरु. • बस आणि मेट्रो बंद. • करोना हॉटस्पॉट विभागात बंद. • मास्क घालणं बंधनकारक लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात काही क्षेत्रांना सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागांना दिला देण्याचा सरकारनं प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे सामान तयार करण्याऱ्या आणि औषधांच्या कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. दुसरीकडे रोजंदरीवर काम करणारे, प्लंबर, सुतारकाम करणारे, इलेक्ट्रीशिअन आणि मोटर मेकॅनिक्स यांनाही नव्या लॉकडाउनमधून सुट देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सपोर्ट सेवा मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यातून सुट देण्यात आली आहे त्यांनी सोशल डिस्टन्स

खारघरच्या घरकुलला पोलिसांचा वेढा ! ....वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार  यांनी घराबाहेर पडणाऱ्यांना घातला लगाम

Image
खारघर: महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघर सेक्टर 15 मधील विस्तीर्ण पसरलेल्या घरकुल सोसायटीतील रहिवाशांचा लगाम ओढत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी तिकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. मोकाट फिरणाऱ्यांसाठी तिसरा डोळा उघडून पाच पोलिसांची नियुक्तही केली आहे. घरकुल सोसायटीमधील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तो परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्या परिसराला सील करण्यात आले. खबरदारी घेत फवारणीही केली. परंतु, तेथील नागरिकांनी लॉकडाउन आणि महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुत्रे फिरवण्यापासून ते मोटरगाडीने फेरफटका मारण्याची स्पर्धा सुरू ठेवली होती. याबाबत पनवेल संघर्ष समितीकडे खारघरच्या काही जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ती कैफियत समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तिदार यांच्याकडे मांडली. पण त्यापूर्वीच तिदार यांनी घरकुलकडे जाणारे रस्ते सील केले आहेत. सोसयटीचा परिसर विस्तीर्ण पसरलेला असल्याने तिथे सहज बाहेर पडताना गाडी घेऊनच नागरिक जात आहेत. त्यांना आवर घालून सगळीकडे बॅरिगेट्स लावले आहेत. त्याशिवाय पाच पोलिस

श्रीवर्धन तहसील कार्यालयात  सर्कल पदावर कार्यरत असणारे *मा. श्री अर्जुन भगत यांचा लॉक डाउन च्या अनुषंगाने एक हात मदतीचा..! 

Image
संपुर्ण जगात कोरोणा विषाणुने थैमान घातले आहे.यामुळे भारता मध्ये दि.२५ मार्च पासुन लाॉकडाऊन असल्या मुळे महाराष्ट्रातल्या रोजनदार ,मोलमजुरी करणाऱ्या वर्गावर उपास मारीची वेळ आलेली आहे.अशा संकटकाळीन वेळे मध्ये हाता वर पोट भरणा-या वर्गा साठी विविध स्तरावर मदत केली जात आहे. या मदतीला सहभाग म्हणून श्रीवर्धन तहसील कार्यालयात  सर्कल पदावर कार्यरत असणारे * मा. श्री अर्जुन भगत  साहेब * यांनी कित्येक मोलमजुरी करण्याऱ्या कामगारांना स्वतःच्या  पैसे खर्च करून जिवनाशक वस्तूचा पुरवठा करत आहेत त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे

लॉकडाऊनचे जनतेने गांभीर्याने पालन करणे आवश्यक     -- -- पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
                                                                                 अलिबाग, जि.रायगड,दि.15 (जिमाका) : केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरिता लॉकडाऊनचा निर्णय राबवीत आहे.  मात्र जनतेनेही संयम ठेवून या लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.         रायगड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यासंबंधीची बैठक पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी त्या बोलत होत्या.           यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौतमल,आमदार बाळाराम पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,प्रितम म्हात्रे, परेश ठाकूर, सतीश पाटील, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त संजय शिंदे, जमीर लेंगरे, सहाय्यक आयुक्त श्याम पोष्टी, श्रीमती तेजस्विनी गलांडे, तहसिलदार अमित सानप, अभिजित खोले, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, डॉ.नागनाथ यमपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे  हे उपस्थित होते.          पालकम

जासई मंडळ अधिकाऱ्यांनी केले परराज्यातील  गरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Image
पनवेल : राज भंडारी  कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी लॉकडाऊन करून संपूर्ण देशाला सरकारने कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची उपासमार होताना दिसून येत असल्यामुळे उरण तालुक्यातील जसाच्या मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तहसीलदार उरण मा श्री भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शना खाली आपले सहकारी तलाठी सोबत घेऊन येथील पर राज्यातून आलेल्या मजुरांच्या दोनवेळच्या अन्नाची खळगी भरण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंमध्ये किराणा सामान या मजुरांना देऊ केल्यामुळे नकळत या मजुरांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान पाहून मदतनिसांनाही आपण केलेल्या कार्याची पावती मिळाली आहे.  यावेळी मंडळ अधिकारी जासई संदीप भंडारे यांनी स्वतः 8000 kg धान्य त्याच्या स्थरावर उपलब्ध केले आणी त्यांचे सहकारी विंधणे तलाठी दीपक पाटील तलाठी, जासई तलाठी डी.एल.पवार, करल तलाठी वैशाली पाटील, शेवा तलाठी विजेंद्र गायकवाड यांनी एकत्र येऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जासई विभागात मोठ्या प्रमाणावर कंटेनर यार्ड आहेत. तसेच परराज्यातील अनेक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर याठ