Posts

Showing posts from April 14, 2020

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  १२५०० हून अधिक कुटुंबाना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप    

Image
  १२५०० हून अधिक कुटुंबाना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप       पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे १२५०० हुन अधिक  गरीब, गरजूंना कुटुंबांना सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदत कार्य केले. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहत, दुर्गम भाग, आदिवासी बांधव, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला.              कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना  रोजगारापासून दूर रहावे लागत आहे अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब गरजूंना तांदूळ, डाळ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. पनवेल भाजपच्या माध्यमातून हे मदत कार्य पोहोचविण्यात आले. यामध्ये भाजपच्या लोकप्रतितिनिधींनीही तसेच काही उद्योजकांनी

कळंबोलीमध्ये माँर्निग वाँक करणा-यावर गुन्हे दाखल , गुन्हे दाखल करूनही लोकं ऐकत नसल्याने पोलिस हतबल

Image
पनवेल/ प्रतिनिधी कोनोराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात , देशात संचारबंदी असताना  मा.पोलीस आयुक्त  नवी मुंबई यांचे आदेशानुसार व मा.पोलीस उप आयुक्त  परि- 2, मा. सहा पोलीस आयुक्त सो, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सतिश गायकवाड यांनी आज रविवार ( दि १२ ) कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या 03 महिला व 53 पुरुषांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याने IPC 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली  कोरोनाने ऱाज्यात थैमान घातले असून दिवसे दिवस बलींची संख्या वाढत आहे . राज्य प्रशासना समोर मोठा चिंतेचा विषय असून कोरानाच्या संसर्गावर मात करण्यासाठी देशाने संचारबंदी हा अति महत्वाचा निर्णय घेतला आहे.तरीही  लोकं गांभिर्याने घेताना दिसून येत नाहीत . त्यामुळे नवी मुंबई पोलिस आ़युक्त संजीव कुमार यांनी कठोर पावले उचलत विनाकरण बाहेर पडणा-या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने काटेकोरपणे पालन करताना कळंबोली  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतिश गायकवाड यांना रविवारी ( दि 12 ) सकाळी 56  जण माँर्निग वाँकला गेल्याची माहीती मिळताच त्यांनी प

*पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठेसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात 'टास्क फोर्स' स्थापन करणार*        *-पालकमंत्री कु.आदिती तटकरे*

Image
वृत्‍त क्रमांक:169 दि.14 एप्रिल 2020 अलिबाग,दि.14(जिमाका)-  करोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषत: पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठे येथे तात्काळ 'टास्क फोर्स' स्थापन करण्यात येणार आहे.      मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित पवार, आरोग्य मंत्री ना.श्री. राजेश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.        या टास्क फोर्समध्ये नामवंत तज्ञ डाॅक्टरांचा समावेश राहणार असून कोविड रूग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, उपचार पद्धती यावर आणि अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेख ठेवणार आहे, आवश्यक तसा सल्लाही देणार आहे. या टास्क फोर्सला ज्येष्ठ आरोग्य तज्ञ व आरोग्य सहसंचालक डाॅ. तात्याराव लहाने यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे.       या माध्यमातून करोनावर मात करणे व नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे.       शासन-प्रशासन  करोना विरुद्ध लढताना  नागरिकांची  सर्व प्रकारे  काळजी  घेत आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासन आपली जबाबदारी घेत आ