शहर वाहतूक शाखेचे घरीच बसण्याचे नागरिकांना आवाहन
पनवेल शहर वाहतुक पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा अवघ्या १७ दिवसात केल्या २२५० जणांवर कारवाया बुधवारी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत २८८ कारवाया शहर वाहतूक शाखेचे घरीच बसण्याचे नागरिकांना आवाहन पनवेल : राज भंडारी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करीत असून नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र नागरिकांची मानसिकता प्रशासनाच्या नाकी दम आणत आहे, त्यातच पोलिसांचे शासनाने हात बांधून ठेवले असल्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत होणारी किरकोळ कारवाई नागरिकांना घरी बसण्यास समर्थन देणारी नाही. मात्र अशा परिस्थितीतही पनवेल शहर पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात नागरिकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना घरी बसण्यासाठी भाग पाडले आहे. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात अवघ्या १७ दिवसात पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने तब्बल २२५० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बुधवारपासून सायंकाळी ५ नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तब्बल २८८ वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करीत त्यांना घरी बसविण्यासाठी धडा शिकविला आहे. दिनांक २३ मार्चपासून सुरु झालेल्या लॉ