फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा!
फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा पनवेल(प्रतिनिधी) आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'तोडी मिल फँटसी' नाटकाचा प्रयोग शनिवारी पार पडला. भारतीय कला केंद्र प्रस्तुत, थिएटर फ्लेमिंगो आणि देसीरिफ इंडिया निर्मित तोडी मिल फँटसी हे म्युझिकल नाटक म्हणजे पनवेलकरांसाठी पर्वणीच ठरली. हे नाटक घडतं ती जागा म्हणजे चक्क तोडी मिल सोशल रेस्टो आणि बारचं प्रशस्त बाथरूम! खरंतर बाथरूम मध्ये घडणारं नाटक ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. नाटक आधारित आहे मिल कामगारांचा आत्ताच्या पिढीला पडलेल्या प्रश्नांवर,ज्यांचे आई-बाप सुद्धा कामगार म्हणून जगले तेव्हा आपणही तेच चाकरीचं आयुष्य जगायच की स्वतःच्या बळावर बिझनेस करायचा या निर्णयाभोवती नाटक फिरतं. अत्यंत कल्पक आणि हटके विचार मांडणारा नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा पनवेलचा राहणारा. त्याने आपल्या लेखणीतून मांडलेल्या फॅंटसीज, नाटकातील संवादांना मार्व्हल,गेम ऑफ थ्रोन्सचे दिलेले कंटेंपररी संदर्भ आणि सुपर कुल तरुणाईच्या भाषेचा दिलेला बाज यामुळे प्रेक्षकांकडून त्याने भरभरून दाद कमावली. कपिल रेडेकर, शुभंकर एकबोटे, जयदीप मराठे,प्रमिती नरक