ये परत भीमा तु.....! - अखिल खैरे - 7769874400
ये परत भीमा तु.....!
आधार होता त्याचा, होता त्याचा पहारा,
तो लखलखता तारा, जेव्हा तुटूनी पडला !
प्रकाशमय जिवनात अंधार झाला सारा,
प्रज्ञासुर्य होऊनी ये परत भीमा तु !!
तुझ्याच लेकरांचा आवर हा पसारा,
अथांग होता सागर, विस्कटला तो किनारा,
तु दिलेली शिकवण भाषणात आहे आज,
मनगठातला जोर कृतीत नाही आज,
समतेचा तो रथ, मातीत रूतला रे
तु-तु, मी-मी करत, तेथेच सोडला रे....
ये परत भीमा तु.....
येशील तु जर का..?, राग मानु नको बा-भिमा,
तुझ्या मळ्याची राखण, करता आली नाही आम्हा,
आला कि लाव चपराक जोरात, नशा उतरव आमची,
आण-आम्हाला भानात, नाळ जोड आमची,
तुझ्या रथाचे घोडे, तेव्हाच एक होईल,
चाक रथाचे तेव्हाच पुढे जाईल,
शोधु कुठे आसमंतात, फिरलो दिशादाही,
ये परत भीमा तु...तुझी लेकरे तुझी वाट पाही.
अखिल खैरे
7769874400
Comments
Post a Comment