प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील 



  • प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील 

  • भिंगारीसह कामोठे आणि टेंभोडेतील प्रकल्पग्रस्तांशी साधला संवाद

  • स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या ६ व्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल : राज भंडारी

 

गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करून घेण्यासाठी केलेल्या ४० वर्षांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारच्या माध्यमातून यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत हा पाठपुरावा केल्यानंतर आता शासनामार्फत सर्व्हे करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा होणारा सर्व्हे हा शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा आहे हे समजण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गावोगावी या बैठका घेवून शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 

 

सिडकोला आज ५० वर्षे पूर्ण होवून गेली, मात्र १९७० साली सिडको आली त्याच्या अगोदर म्हणजेच जवळपास १९४० च्या आसपासचा असलेला सर्व्हे त्यांनी रेकॉर्डवर घेवून काम सुरू केले. मुळातच ३० वर्षांचा फरक आणि आता त्या सर्व्हेनुसार तब्बल ७० वर्षांच्या या कालखंडात गरजेपोटी नव्याने बांधण्यात आलेली घरे, चाळ, दुकाने ही सिडकोच्या रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे सिडको प्रशासन ही शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांची हक्काची घरे अनधिकृत ठरवीत आहे. त्यामुळे आपल्याला ही घरे वाचवायची आहेत म्हणून या स्व. दि.बा.पाटील यांच्या नावाने महविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती नेमण्यात आली.

 

यावेळी शेतकऱ्यांना मुद्दा समजावून सांगण्यासाठी नुकतीच खारघर, नावडे, कळंबोली येथे शेतकऱ्यांशी समितीने चर्चा केल्यानंतर आता पुन्हा या चर्चेचा दुसरा टप्पा पार पडला. यामध्ये भिंगारी, कामोठे आणि टेंभोडे येथील शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांनी या चर्चा सत्रामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देवून आपली उपस्थिती दर्शविली.

 

यावेळी स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा रायगड शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार तथा समितीचे कार्याध्यक्ष बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा समितीचे सल्लागार आर.सी.घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा समितीचे उपाध्यक्ष सतीश पाटील, समितीचे सचिव सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, आर.डी.घरत, के.के.म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, विश्वास पेटकर आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी गरजेपोटी घरांबाबत सिडकोने आपली कशा पद्धतीने फसवणूक केली आहे आणि त्यातील सुरू असलेल्या गेल्या ५० वर्षांच्या लढ्याला आपण कसे हाताळत आहोत. याचा लेखाजोगा यावेळी समितीच्यावतीने समोर ठेवण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणांतून सरकार हे आपले एकणारे सरकार आहे, आणि त्यामुळे आपल्या सर्व स्थानिक शेतकरी, प्रकल्पग्रस्त बांधवांचे भले करून देणारे सरकार आहे. त्याचा योग्य फायदा उचलून आपण आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, आणि यासाठी शासनामार्फत होणारा सर्व्हे याला आपण सहकार्य करून तसेच स्वतः हजर राहून तो करून घेतलाच पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर