• १५ डिसेंबर पासून म्हसळा वाहतूक होणार One Way 

• "रायगड मत" वर्तमान पत्र, अनेक सामाजिक संघटना आणि म्हसळ्यातील पत्रकार यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश. 

• जशी "ट्रॅफिक"च्या समस्ये साठी जनता एकत्र आली आणि पोलिसांनीही धाडसी निर्णय घेतला, तसाच रस्ते बांधकाम विभागाने पुढे येऊन रस्ते दुरुस्ती करून आपणही कधी-कधी काम करतो असे दाखवले तर बरे होईल. 

म्हसळा (जितेंद्र नटे)

             म्हसळा शहर श्रीवर्धन - दिवेआगर कडे हमरस्त्यावर लागणारे एक छोटेसे शहर. इथे वाहतूक कोंडी नेहमीचंच. मात्र हि समस्या लवकरच सुटणार आहे आणि होणाऱ्या त्रासापासून म्हसळेकराना थोडी का होईना शांती मिळणार आहे. १५ डिसेंबर पासून म्हसळा बायपास मार्गे मोठ्या गाड्या वळवण्यात येणार आहेत. त्यामध्ये एसटी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, ट्रक, कंटेनर यासारख्या मोठ्या वाहनांना म्हसळ्यातून जाता येणार नाही. यामुळे म्हसळ्यात थोड्याबहुत प्रमाणात का होईना वाहतुकीचा त्रास कमी होणार आहे. यासाठी अनेक दिवस "रायगड मत"च्या माध्यमातून बातम्याही प्रकाशित करण्यात आल्या होत्या. चॅनेलच्या माध्यमातून अनेक व्हिडीओहि दाखवण्यात आले होते. कशी फुटणार म्हसळ्यातील कोंडी? हा एकाच प्रश्न सतावत होता. अगदी खासदार सुनील तटकरे साहेब, म्हसळा पोलीस यांच्यापर्यंत संपर्क साधून हा विषय "रायगड मत" ने मांडला होता. अनेक संघटना, पत्रकार, तसेच म्हसळ्यातील जाणते समाजसेवक यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. शेवटी धडाकेबाज निर्णय घेणारे धनंजय पोरे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी मार्ग काढला आहे. आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांनी शेवटी "वने-वे" करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. म्हसळेकरानी त्यांच्या या निर्णयाचे कोतुक आणि स्वागत हि केले आहे. म्हसळ्यातील जनतेतर्फे त्यांच्या या कामगिरी बद्दल पुष्पगुछ देऊन आभारही माणण्यात आले आहे. यावेळी शहरातील विविध संघटना उपस्थित होत्या. समाजसेवक बालशेट करडे उर्फ सुभाष करडे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, नंदूशेठ सावंत, खंगारशेठ राजपूत, जबाबर शेठ रजपूत, संतोष पानसरे, मनोहर तांबे, नदीम दळवी, पोलीस उपनिरीक्षक दीपक डूस, सूर्यवंशी, ट्राफिक हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते. 

             म्हसळा तालुक्यात आल्यापासून काही ना काहीतरी चांगले काम करण्याचे धाडस सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे हे करीत आले आहेत. नुकताच त्यांना केंद्रीय पोलीस पुरस्कारहि प्राप्त झाला आहे आणि आता वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अनेक लोकांचा रोष ओढून घेणारा धाडसी निर्णय म्हसळा पोलिसांनी घेतला आहे. शहरात उगाचच चकरा मारून चमकेगिरी करणाऱ्याना आता चांगलाच चाप बसणार आहे. 

           ट्राफिकची समस्या सुटणार - पण अरुंद रस्ते, काम न करणारे नेते आणि कंत्राटदारांकडून फक्त टक्केवारी खाणारे "रस्ते बांधकाम विभाग" (PWD) खाते, रस्त्याला जागा न सोडता बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या इमारती. म्हणजे म्हसळेकरांची नुसती डोकेदुखी आहे. या समस्या कधी सुटणार? नेतेमंडळी मात्र 'तेरी भी चूप और मेरी भी चूप असे घाणेरडे राजकारण खेळनण्यात व्यस्त आहेत. 

             यासारख्या अनेक समस्या सोडविण्यासाठी म्हसळेकर एकत्र कधी येणार? हा प्रश्न सुद्धा चर्चिला जात आहे. एकदिवस नक्कीच या गोष्टीचा स्फोट होईल आणि जागृत नागरिक PWD रस्ते बांधकाम विभागावर मोर्चा काढेल यात शंकाच नाही. पुढील महिन्यात म्हसळा नगरपंचायतचे इलेक्शन आलेच आहे. त्यावेळी निष्क्रिय नगरसेवकांना, काम न करता निधीचा दुर्व्यव्हार करणाऱ्या नगरसेवकांना जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. 

            जशी "ट्रॅफिक"च्या समस्येसाठी जनता एकत्र आली आणि पोलिसांनीही धाडसी निर्णय घेतला, तसेच रस्ते बांधकाम विभागाने पुढे येऊन रस्ते दुरुस्ती करून आपणही कधी-कधी काम करतो असे दाखवले तर बरे होईल. तोपर्यंत वाट पाहू या अचानक आलेल्या आणि नको असलेला पावसाळा जाण्याची.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर