विभागीय कार्यशाळा रामवाडी पेण येथे महामानवाला विनम्र अभिवादन
विभागीय कार्यशाळा रामवाडी पेण येथे महामानवाला विनम्र अभिवादन
श्रीवर्धन: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामवाडी विभागीय कार्यशाळा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आली या वेळी यंत्र अभियंता मा श्री माने साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ संघर्ष करा अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
तर उपयंत्र अभियंता मा श्री जुनेदी एम बी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारतीय राज्यघटनेचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नामकरण भारत असे केले तर प्रत्येक नागिकस भारतीय ही ओळख दिली डॉ बाबासाहेब आंबेकरांनी अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच न्याय मिळवून देणारे, जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध लढणारे, बहुजन समाजातील प्रत्येकाला मानाने जगण्याची शिकवण देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तसेच कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या विविध महत्त्व पूर्ण तरतुदी विषयी सविस्तर माहिती दिली या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment