• श्रीवर्धन येथे महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी - नागरिकांमध्ये संताप • श्रीवर्धन येथे महिला सुरक्षित कि असुरक्षित ? • आमदार - पालकमंत्रीहि महिला आहेत, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा!
• श्रीवर्धन येथे महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी - नागरिकांमध्ये संताप
• श्रीवर्धन येथे महिला सुरक्षित कि असुरक्षित ?
• आमदार - पालकमंत्रीहि महिला आहेत, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा!
श्रीवर्धन (जितेंद्र नटे / सोपान निंबरे) :
श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज नवनवीन प्रकार घडत असतात. अश्यातच दिनांक २२-१२-२०२० रोजी एका महिलेला शिवीगाळ आणि मारण्याच्या धमकीचा प्रकार घडला. या घटनेची सविस्तर माहिती देताना श्रीवर्धन येथील महिला रहिवाशी अनिता प्रदीप गौतम ह्या सांगत होत्या कि, "रस्त्यावरून चालत जात, असताना महेश सायगावकर या इसमाने मला शिवीगाळ केली तसेच गैरशब्दही वापरले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली"
या संधर्भात श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, हे दोन्हीही व्यक्ती एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यांचा आपापसात अगोदरपासूनच वाद आहेत. त्यांच्यामध्ये मागील भांडणाचा राग मनात ठेवून महेश सायगावकर याने त्यांना शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली असे म्हणणे महिला तक्रारदार श्रीमती अनिता प्रदीप गौतम् यांची आहे. आम्ही त्यांची एन. सी. नोंदवून घेतली आहे व पुढील तपास चालू आहे. प्रथम न्यायदन्डाधिकारी तहसील श्रीवर्धन या ठिकाणी हे प्रकरण गेले असून लवकरच जाब जबाब नोंदवुन घेऊन त्यांचे १७० कलम लागेल असे श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे कर्तव्यकक्ष पोलीस निरिक्षक श्री. बाबर यांनी सांगितले. तक्रादारच्या पतीचे आणि विरोधक यांच्या काही देण्याघेण्यावर आधीपासूनच वाद आहेत. ते दोघे हि एकमेकाना ओळखतात. पुढील तपास चालू असून न्यायदंडाधिकारी यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू.
प्रश्न हा आहे कि महिला सुरक्षित कि असुरक्षित. साधी एन. सी. कि एफ.आर.आई.? या आधीही त्यांना अशाच प्रकारे शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मात्र पोलीस ठोक भूमिका का बजावत नाहीत असे तक्रारदार अनिता यांचे पती प्रदीप गौतम यांचे म्हणणे आहे. प्रदीप गौतम यांनाही धमक्या आल्या आहेत. त्यांनी श्रीवर्धन येथील काही व्यक्तीकडून व्याजाने भिसीमधून पैसे घेतले होते त्याचे वाद चालू असून त्यांनी तक्रारही केल्या आहेत. मात्र अजून पर्यंत कुणाला अटक झाली नाही. अशी माहिती तक्रारदार यांचे पती प्रदीप गौतम यांनी सांगितले. याचा अर्थ श्रीवर्धन मध्ये व्याजाने पैसे देण्याचे बेकायदेशीर धंधे चालू आहेत का ? असा संशय सध्या नागरिकामधून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात अनेक लोकांची नावे असल्याचे अनिता प्रदीप गौतम यांनी सांगितले. लवकरच सर्वांची नावे घोषित करून महिला आयोगाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिवसेंदीवस अनेक महिला अत्याचार घडत असतानाच्या घटना आपण वाचत असतो. मात्र श्रीवर्धन सारख्या पेशव्यांच्या जन्मस्थळी महिला असुरक्षित असणे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. श्रीवर्धनच्या आमदार तथा पालकमंत्री या महिला आहेत. लवकरच या प्रकरणात त्या लक्ष घालतील आणि महिलांच्या अन्याय अत्याचार प्रकरणी लक्ष घालतील अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही.

Comments
Post a Comment