• अवघ्या चार तासात कामोठेत खुलेआम गोळीबार करणारे जेरबंद! • हाॅटेल देशी ढाबा मध्ये अकरा जणांच्या टोळक्याचा राडा ,दोन जखमी • डॅशिंग पोलीस ऑफिसर संजय पाटील यांच्या दणक्याने गुंडाविश्वाला हादरा!
• अवघ्या चार तासात कामोठेत खुलेआम गोळीबार करणारे जेरबंद!
• हाॅटेल देशी ढाबा मध्ये अकरा जणांच्या टोळक्याचा राडा ,दोन जखमी
• डॅशिंग पोलीस ऑफिसर संजय पाटील यांच्या दणक्याने गुंडाविश्वाला हादरा!
पनवेल दि: 28 डिसेंबर (प्रतिनिधी) नाताळच्या निमित्त सर्वत्र धुमधमाल सुरू असतानाच कामोठेत 26 डिसेंबरला रात्री थरारक प्रकार घडला. मद्यप्राशन करताना झालेल्या किरकोळ वादाचा भडका उडाला, अकरा जणांच्या टोळक्याने जबरदस्त हाणामारी करत खुलेआम गोळीबार केला.यात दोघे जखमी झाले असून त्यांच्याकडून गाड्या व मोबाईलसह लाखोंचा मालही लुटून हे टोळके फरार झाले या घटनेची फिर्याद दाखल होताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी डॅशिंग कारवाई करत फक्त चारच तासात यापैकी सात गुंडाना जेरबंद करत मुद्देमालही हस्तगत केला. पाटील यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून कामोठे आणि परिसरातील गुंडाविश्व मात्र जबरदस्त हादरले आहे.
कामोठेतील प्रसिद्ध अशा हाॅटेल देशी ढाबा मध्ये 26 डिसेंबरला रात्री 9:30 च्या सुमारास मयुर बबन जाधव (27) आणि त्याचा भाऊ योगेश (29) रा. कळंबोली, नवी मुंबई हे आपल्या मित्रांन सोबत दारू पित बसले होते. त्यावेळेस तिथे त्यांच्याच ओळखीचे मॅडी उर्फ मधुकुमार सुदन व त्याचे साथीदार राकेश ठाकूर, मोहन गवडा, विजय नाडर, अली,थापा, तेजस, गौरव, अमय, नंदकिशोर असे अकराजण आले. त्यांच्यात वादावादी झाली.
या वादाचे पडसाद बाहेर उमटले. जाधव बंधू बाहेर बाहेर येताच या अकराजणांच्या टोळक्याने त्यांना घेरले. तुफान धुमश्चक्री उडाली. मारहाणीदरम्यान अली याने पिस्तूल काढून फायरिंग केले. प्रथम हवेत नंतर त्याने योगेश याला निशाणा बनवून फायर केले. योगेश यांनी ती गोळी चुकवली. त्यानंतर या टोळक्याने दगडफेक करत जाधव बंधूना जखमी केले. ते जखमी झाल्याचे पहाताच या टोळक्याने त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांचीच टाटा नेक्साॅन कार घेवून पळ काढला.इतर दोन कार आणि दोन मोटारसायकल घेवून हे टोळके फरार झाले.
या घटनेची फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सर्व सूत्रे हाती घेतली.नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह,पोलीस सहआयुक्त जय जाधव, परिमंडल 2 चे उपआयुक्त शिवराज पाटील आणि सहा. पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तपास सुरू केला. फिर्यादीकडून आरोपीची माहिती मिळताच त्यांनी कोपरखैरणे,सानपाडा, नेरूळ, कामोठे परीसरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यामुळेच फक्त चार तासात या प्रकरणातील सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच गावठी कट्टा,टाटा नेक्सान, ओलस वॅगन वेन्टो, वोल्क वॅगन, बजाज पल्सर मोटरसायकल, आणि मोबाईल असा एकूण 16,79000 चा मुद्देमालही जप्त केला.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यानजीकच्या मंथन हाॅल येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या तपासाची माहिती देण्यात आली. आता पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे करत आहेत.
Comments
Post a Comment