• कोळवट गावच्या रहिवाशी कै. विजया विजय खेडेकर यांच्या आकस्मिक जाण्याने नागरिकांनी व्यक्त केली हळहळ
• सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याचा प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
• दिनांक २६-१२-२०२० वार शनिवार रोजी त्यांचे दहावे कार्य श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे होणार आहेत आणि बारावे विधी कार्य २८-१२-२०२० रोजी मु. कोळवट येथे होणार आहेत.
म्हसळा (जितेंद्र नटे) :
मायेची सावली म्हणून ओळख असणाऱ्या, सर्वांच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या कोळवट गावच्या रहिवाशी कै. विजया विजय खेडेकर यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिनांक १७/१२/२०२० रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे कष्ट करून कुटुंब वाढवलेल्या विजया यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांच्या जीवाला चटका लागून राहिला आहे. पण काळ वेळ हि आपल्या हातात नसते. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती विजय खेडेकर आहेत आणि तीन मुलं आहेत. धार्मिक कामात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पती विजय यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीची हि मोठी साथ होती. आज हि साथ अधुरी राहिली. सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याचा प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. अश्या या माउलीचे उद्या दिनांक २६-१२-२०२० वार शनिवार रोजी त्यांचे दहावे कार्य श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे होणार आहेत आणि बारावे विधी कार्य २८-१२-२०२० रोजी मु. कोळवट, तालुका म्हसळा येथे होणार आहेत.
Comments
Post a Comment