समाज भान राखून ठेवला आदर्श!
लतिफ शेख यांचा वाढदिवस शांततेत साजरा
पनवेल (प्रतिनिधी) : नेता म्हटला की कार्यकर्ते आले,वाढदिवस आला,धामधुम,दणका आलाच, पण सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक लतीफ शेख यांची बातच निराळी. कोरोनात समाजासाठी झोकून देणाऱ्या या समाज सेवकाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला तो शांततेच्या कोलाहलात.उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केवळ केक कापून कोणताच डामडौल न करता या नेत्याने त्याचे समाजभान दाखवून दिले.एक प्रकारे त्यांनी एक आदर्शच समाजासमोर ठेवला आहे.
गुरुवार दि 24 डिसेंबर ला लतीफ शेख यांचा वाढदिवस. तो दणक्यात साजरा करण्याची तयारी करूनच त्यांचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 14 मधील मुस्लिम मोहल्ल्यात पोचलेही. मात्र कोरोनाने आज अनेक घरांची वाताहात केली आहे, अनेकांचे रोजगार गेलेत, कितीतरी बळी या महामारीने घेतलेत अशावेळेस मी माझा वाढदिवस साजरा करून त्यांच्या दु:खाला नजरेआड करू शकत नाही, माझे मन त्याला परवानगी देत नाही असे सांगत त्यांनीच कार्यकर्त्यांना समजवले.या काळात जेवढी करता आली ती मदत केली पण ती खूप कमी आहे त्यामुळेच हा सोहळा नको अशी भुमिका त्यांनी घेतली.
त्यानंतर केवळ कार्यकर्त्यांचा मान राखत त्यांनी शांततेत केक कापला. सारा बडेजाव नाकारत कोरोना ग्रस्तासाठी सहानुभूतीपूर्वक विचार त्याचबरोबर सोशल डिस्टस्निंगचे पालन करून समाज भान राखणाऱ्या लतीफ शेख यांचे आता सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
यावेळी त्याच्यावर प्रेम करणारे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना यावेळेस ड्रिम माय हाॅलिडेज या टूर्स आणि ट्रॅव्हल्स चे व्यवस्थापकीय संचालक इरफान तांबोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्रानं पैकी तबरेज कच्ची,मुन्ना सेन,साद डॉलारे,मुन्ना अन्सारी, सलमान मुकादम,मोईन मुखरी, शोएब खलिफा आदी मित्र कार्यकर्ते उपस्थित होते.
[कोरोनाच्या काळात लतीफ शेख यांनी समाजात जातपात न पहाता प्रचंड मदत केली. सर्वसामान्य नागरिकांना शिधा वाटप,रिक्षाचालकांना रेशन, सॅनिटायझर वितरण अशा सर्वच ठिकाणी त्यांचा पुढाकार होता. कोरोना बळींच्या दफनविधीसाठी त्यांनी घेतलेली भुमिका आणि त्यांचे कार्यही कौतुकास्पद ठरले आहे.]
Comments
Post a Comment