• मित्रांसाठी दिलीप - समाजामध्ये समाजसेवक दिलीप कांबळे - राजकारणामध्ये दिलीपजी कांबळे साहेब .... आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच होत आहेत... निवृत्त्त
• कुठे थांबले पाहिजे हे ज्याला कळले, त्याला जगण्याचा मार्ग कळला.
• दिलीप कांबळे यांना रायगड जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा "रायगड मत भूषण पुरस्कार" जाहीर
म्हसळा / जितेंद्र नटे (रायगड मत)
म्हसळ्यात आज चर्चिली जाणारी बातमी एकच होती - ती म्हणजे दिलीप कांबळे यांची राजकारणातून निवृत्ती. मला आठवतय १९९४ साली दिलीप कांबळे हा संजीवनी पतपेढीसाठी काम करीत असे. तेव्हा मी १० वीला होतो. नवीन शाळेतून खाली उतरलो कि, कधी दिलीप कांबळे एक तरुण हा बसलेला असायचा. मला काही त्यावेळी शिक्षणाशिवाय काही कळत नव्हते. मात्र समाजाचे सर्व कार्यक्रम दिलीप कांबळे हाताळायचे हे माहित होते. तिथून तो सुहास महागावकर म्हणजे आमचे दादा जेष्ठ समाजसेवक यांना फोन करायचा आणि पुढील कार्यक्रम आखायचा. मित्रानो त्यावेळी फोन म्हणजे खूप मोठी गोष्ट. मी हि तिथे कुतुहूल म्हणून जात असे. दिलीप दादा अनेक गोष्टी सांगत असे. मी त्याला दादा म्हणत असे पण तो दादा, भाई, साहेब कधी बनलाच नाही. वयाने आणि मानाने मोठा आहे मी कोण तरी साहेब आहे असे त्यांनी कधी व्यवहार केलेच नाही. त्यामुळे आम्ही कधी कधी त्याला एकेरी हाक मारायचो आणि आज हि मारतो. हीच त्याची किमया आणि मोठेपणा आहे. सर्वांशी मित्राचे नाते कसे जुळवता येईल असाच त्याचा प्रयत्न असायचा. त्याच्या याच स्वभावामुळे त्याने माणसे जोडली. माणसे तोडणारी माणसे सुद्धा त्याने जोडली. अनेक वर्षे समाजसेवा केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या म्हसळा तालुक्यात किती स्पर्धा आणि घाणेरडे राजकारण चालते हे वेगळे सांगायला नको. त्यातही त्यांनी बाजी मारली सर्वांशी प्रामाणिक राहत ज्या पक्षात गेले या पक्षात त्यांनी निष्ठेने काम करून दाखविले. याचीच पोच पावती म्हणून त्यांना कोकणचे भाग्यविधाते सुनिलजी तटकरेसाहेब यांनी म्हसळा नगरपंचायतीचे "प्रथम नगराध्यक्ष" पद दिले. हा त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणायला काही हरकत नाही. म्हसळा तालुक्यातील सर्व समाजासाठी, म्हसळा तालुक्यातील नागरिकांसाठी जेवढे करता येईल तेवढे समाजकार्य आणि राजकीय ताकदीचा वापर करून ज्या योजना पोहचवता येथील तेवढ्या त्यांनी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे. एका बँकेचे ते संचालक मंडळावरही आहेत. अनेक लोकांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना सहकार्य करणे हा त्यांचा समाज धर्म राहिला आहे आणि असा माणूस आज निवृत्त होतोय हि गोष्ट राजकारणी मंडळींसाठी आदर्श म्हणायला हरकत नाही. अनेक राजकारणी लोकांनी यातून काहीतरी शिकले पाहिजे आणि निवृत्त व्हायला पाहिजे कारण ते निवृत्त होतील तेव्हा कुठे दुसऱ्या लोकांना चान्स मिळेल. मात्र म्हसळ्यातील काही राजकारणी मंडळींची सगळी केस पिकली, दातही पडू लागले तरीही सत्तेला मुंगळ्यासारखे चिकटून बसले आहेत. सत्ता आणि कंत्राट हे अनेक लोकांचे गणित असते. काही लोकांचे तर राजकारणावर पोट भरले जात असते. मात्र दिलीप कांबळे याला अपवाद आहेत. आपले चरित्र अबाधित राखण्याचे काम दिलीप कांबळे यांनी केले आहे. आपल्या उभ्या आयुष्यात कुठलाही डाग न लावता आपला स्पेअर पार्टचे ऑटोमोबाइल दुकान चालवून रोजीरोटी मिळवणारा, अनेक प्रसंगाला तोंड देत आपले राजकीय प्रवासाला राम राम जरी त्यांनी ठोकला असला तरी तरुणांसाठी आणि इतर राजकारण्यांसाठी दिलीप कांबळे आदर्शच आहेत. त्यांच्याकडून उर्वरित आयुष्यात समाजसेवा घडो याच आमच्याकडून शुभेच्छा.
त्यांच्या ह्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दाखल घेऊन रायगड जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा "रायगड मत भूषण पुरस्कार" जाहीर करण्यात येत आहे. लवकरच "रायगड मत"चा पुरस्कार वितरण कार्यक्रम घेऊन त्यांचा यथोचित म्हसळा तालुक्यातील जनतेतर्फे आणि मित्र परिवार यांच्या तर्फे भव्य-दिव्य, दणदणीत नागरी सत्कार करण्यात येईल.
Comments
Post a Comment