• म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय चित्तरंजन पोरे यांचा केंद्रीय गृहमंत्री पोलीस पदकाने गौरव
• रायगड जिल्ह्यातील फक्त आणि फक्त म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस सहायक निरीक्षक धनंजय पोरे हे एकमेव अधिकारी आहेत.
म्हसळा / जितेंद्र नटे @रायगड मत
रायगड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यातच म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय चित्तरंजन पोरे यांचा रायगड जिल्हा पोलीस जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री यांचे पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी ठाणे ग्रामीण पोलिस ठाणे येथे असताना एक थरारक गुन्ह्याचा शोध लावला. टोकवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृत महिला असल्याची खबर आली. धनंजय पोरे यांच्याकडे तपासाची जबादारी देण्यात आली. मात्र ही महिला आली कुठून शोध कसा घेणार? काहीच धागादोरा नव्हता. त्या महिलेच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र होते. त्या मंगळसूत्रातील दोन मणी हे लाल रंगाचे होते. याचा गोष्टीचा आधार घेत त्यांनी हा विशेष मंगळसूत्र कुठल्यातरी विशेष प्रदेशातील असणार याचा अंदाज बांधला. शोध घेतल्यानंतर माहिती समोर आली की, असे विशेष मंगळसूत्र फक्त कर्नाटक राज्यात गुलबर्गा जिल्हात बनतात, पोलीस पोचले गुलबर्गा येथे पुढील तपास करून एका गावात पोचले आणि माहिती मिळाली की, एक महिला गायब आहे. लोकांना फोटो दाखवले असता होय असे उत्तर मिळाले. आणि अश्या प्रकारे काहीही धागादोरा नसताना केवळ मंगळसूत्राच्या दोन लाल मण्यांच्या आधारे आरोपीची ओळख पाठवण्यात यश आले. केवळ चार दिवसात त्यांनी हे काम पूर्ण केले, याच कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्यातर्फे त्यांना दहा हजार रुपये रोख व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले होते. या अगोदर केलेल्या अनेक गुन्ह्याचा तपास चांगला केला व सध्या म्हसळा पोलीस ठाणे येथे ते धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. त्यांना म्हसळा तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आणि "रायगड मत"चे संपादक जितेंद्र नटे यांच्यावतीने लाख लाख शुभेच्या देण्यात आल्या आहेत. लवकरच त्यांचा म्हसळा नागरिकांच्या वतीने आणि "रायगड मत"च्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या गौरवाचे वाटेकरी माझे सर्व सहकारी पोलीस दल, नागरिक आणि कुटुंब असल्याचे म्हटले आहे. सर्वाना सोबत घेऊन सर्व धर्म, सम, भाव जपत म्हसळ्यामध्ये शांती-अंमल कायम राखण्याचे त्यांचे मनोधैर्य आहे. एक चांगले सहायक पोलिस निरीक्षक मिळाले, असे जनतेमध्ये सध्या चर्चा ऐकिवात येत आहे. भविष्यात त्यांना असेच यश प्राप्त होवो असे म्हसळेकरांच्या शुभेच्छा.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रिय पोलीस दलातर्फे फक्त 11 पोलीस अधिकाऱ्यांनाच पदके देऊन गौरविण्यात आले आहे आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्यात फक्त आणि फक्त म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस सहायक निरीक्षक धनंजय पोरे हे एकमेव अधिकारी आहेत.
Comments
Post a Comment