श्रीवर्धन ग्रुप ग्रा. दिघीमध्ये ग्रामसेवक मधुकर भालदार याने केला ७० लाखांचा भ्रष्टाचार # विस्तार अधिकारी यांनी केलेल्या दप्तर तपासणीत झाले उघड ; ग्रामसेवक भालदारला तीन वेळा निलंबित करण्यात आले होते
श्रीवर्धन ग्रुप ग्रा. दिघीमध्ये ग्रामसेवक मधुकर भालदार याने केला ७० लाखांचा भ्रष्टाचार # विस्तार अधिकारी यांनी केलेल्या दप्तर तपासणीत झाले उघड ; ग्रामसेवक भालदारला तीन वेळा निलंबित करण्यात आले होते
श्रीवर्धन\सोपान निंबरे
श्रीवर्धन दिघी ग्रुप ग्रामपंचायत उप सरपंच गीता भद्रसेन वाढई यांनी ग्रामसेवक भालदार यांनी ग्रामपंचायत मध्ये केलेला गैरव्यवहाराबद्दल बोलताना सांगितले ग्रुप ग्रामपंचायत दिघीमध्ये ग्रामसेवकांकडून भ्रष्टाचाराची योजना आखली आहे. अस म्हणायला हरकत नाही. २८ जाने २०१४ ला पं. स. श्रीवर्धन कडून दिघी ग्रा.पंचायतीची दप्तर तपासणी केली असता ग्रामसेवक बि. बि.घनमोडे याने २०११ वर्षी १८ दिवसाच्या कालावधीत रु ६ लाख ५० हजाराची अपहार, ग्रा.वि. अधिकारी एस एस श्रीवर्धनकर यानी२०११ ते २०१४ या कालावधीत ६१ लाख ९३ हजाराची अफहार, तर ग्रामसेवक एम एच भालदार यांनी २०१४ ते २०१५ या कालावधीत १३ लाख ७२ हजार रुपयांची अपहार केल्याचे उघड झाले आहे. याआधीही ग्रामसेवक मधुकर हरी भालदार यांना तीन वेळा निलंबित करण्यात आले होते असे असतांना यांनी पदाचा दुरुपयोग करून १४ वित्त आयोगाच्या निविदा उघडणे प्रक्रिया करावयाच्या अगोदरच योजनेची रोख रक्कम काडून अपहार केला असल्याचा प्रकार उप सरपंच गीता भाद्रसेन वाढई यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी पंचायत समिती श्रीवर्धन बीडीओ विस्तार अधिकारी यांना अनेक तक्रारी अर्ज केले असून ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. ग्रामसेवक मधुकर भालदार यांनी शासनाचे नियमांचे उल्लंघन करतील १४ वित्त मूळ आराखडा असतांना बोगस आराखडा बनवून ई-टेंडरिंग न करता कुठलीही विकासकामे केली नसताना १४ वित्त आयोगा मधून रोख रु २५ लाखांचा अपहार केले आहे. या बरोबर गेली काही वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयातील मुद्रांक शुल्क, ग्रामनिधी, १४वा वित्त यातील रोख रक्कम उगडपणे काढली आहे. ग्रामसेवक मधुकर भालदार याने शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रिया न करता, मासिकसभेत विषय न घेता, मूल्यांकन प्रक्रिया न करता लाखो रुपयांची रक्कम हडपली असून ग्रामसभेत व मासिक सभेत ठराव केलेल्या कामाच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम काढली असल्याचे दिसून आले आहे. शासननियमांना पायदळी तुडवत शासनाचीही फसवणूक केली असून सर्वसामान्य जनतेच्या व प्रशासनाच्या पैश्यावर मनमानी कारभार करून डल्ला मारला आहे. अस असताना उप मुखकार्यकारी अधिकारी ग्रा.पं. शीतल पुंड का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होत आहेत.
१४वित्त आयोगाची रक्कम काम न करता काढता येते का?? याला जबाबदार कोण...
१४वित्त आयोगाचे ग्रामपंचायत स्थरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, नियंत्रण व समन्वयनाची जबाबदारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रा.पं. यांची असून त्याकरिता उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावरील १४ व्या वित्त आयोगांतर्गत वितरित निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी दर महिना बैठक होत असून निधीच्या खर्चाबाबतचा व उपयोगिता प्रमाणपत्र अहवाल संबंधित मूख्य लेखा , वित्त अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला जातो.
ग्रामसेवकाने१४ वित्त आयोगाच्या या त्रुटी व शासन नियमांचा उल्लंघन केले
प्रमाणक व निविदा प्रक्रिया शिवाय खर्च . खरेदी व वापराचा तपशीलाची रजिस्टर मध्ये नोंद नाही . शासन निर्णयानुसार वजावटी कपात न करणे . वर्कऑर्डर न करणे .
ई. टेंडरिंग निविदा प्रक्रिया न करणे . तुलनात्मक तक्ता व कामाचे वर्कऑर्डर न करणे . खरेदी व वापराचा तपशील टी.सी.एल रजिस्टर ला नोंद न करणे . अंदाजपत्रक व मूल्यांकन न करणे . रक्कम कोणत्या कामाकरीत अदा केली त्याचा तपशील नोंद नसणे .
Comments
Post a Comment