बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ६ वी पुण्यतिथी साजरी काँग्रेस भवन येथे काँगेस नेत्यांनी केले प्रतिमेस अभिवादन


बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ६ वी पुण्यतिथी साजरी

 

काँग्रेस भवन येथे काँगेस नेत्यांनी केले प्रतिमेस अभिवादन
 

 पनवेल : राज भंडारी

 

बॅ ए.आर.अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले.

 

भारतातील मोजक्या राजकारण्यांमध्ये आदराने नाव घेतले जायचे असे व्यक्तिमत्व म्हणजे बॅरिस्टर ए.आर.अंतुले. त्यांच्या निधनानंतर गेल्या ६ वर्षांपूर्वी त्यांची उणीव काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना भासू नये आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एक ऊर्जा मिळत असते. बॅरिस्टर अंतुले यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले.

 

बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी झाला तर त्यांचे निधन २ डिसेंबर २०१४ रोजी झाले. ते भारतातील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री आणि महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले हे मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पाहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री राहिले.

 

रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८०मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८२मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम देणे भाग पडले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९ व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले. २००४ साली १४व्या लोकसभेवर निवडून आले.

 

२ डिसेंबर २०१४ रोजी अंतुले यांचे निधन झाले. अशा या महान नेत्याच्या आठवणी काँग्रेस पक्षामध्ये जिवंत ठेवल्या जात आहेत. बुधवारी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील काँग्रेस भवन येथे सकाळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, सुनील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कटेकर, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, अनिल जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ निर्मला म्हात्रे, ओबीसी सेल अध्यक्ष जनार्दन पाटील, पनवेल तालुका काँग्रेसचे  कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नोफिल सय्यद, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष मोहन गायकवाड, डॉक्टर सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजेश घरत, रायगड सेवादलाचे अध्यक्ष डी एस सेठी, रायगड जिल्हा विधी सेलचे के एस पाटील, राजीव चौधरी, विश्वजीत पाटील, धनंजय क्षीरसागर, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयक शशिकला सिंग, अमित लोखंडे, विनीत कांडपिळे, कपिल यादव, भरत म्हात्रे, वसंत काठावले, सौ भारती चौधरी, सौ मंजुळा कातकरी, सुदेशना रायते, माया अहिरे, लतीफ शेख, कॅप्टन कलावत, हरपिंदर वीर, जयवंत देशमुख, विजय केणी, राहुल जानोरकर, रघुनाथ पाटील, आरती ठाकूर, जयश्री खटकाले, सोनिया सहोटा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर