श्रीवर्धनमधील आराठी निष्क्रिय ग्रामपंचायतीत कचरा विल्हेवाट करण्याचा प्रश्न गंभीर. #कोराना काळात रोगराई पसरण्याची भिती ! ग्रामपंचायत कचरा उचलण्यास अक्षम !!



  • श्रीवर्धनमधील आराठी निष्क्रिय ग्रामपंचायतीत कचरा विल्हेवाट करण्याचा प्रश्न गंभीर.

  • कोराना काळात रोगराई पसरण्याची भिती ! ग्रामपंचायत कचरा उचलण्यास अक्षम !!


श्रीवर्धन (सोपान निंबरे) :
        झपाट्याने नागरीकरण होणारे गाव म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गावाचा उल्लेख केला जातो,
 नागरी वस्त्या वाढत असल्याने आराठी गावची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आराठी ग्रामपंचायती कडून कचरा विल्हेवाटी करिता घंटागाडी चालू होती,परंतू गेल्या अनेक महिण्यांपासून कचरा गोळा करणारी आराठी ग्रामपंचायती मार्फत येणारी कचरा गाडी अचानक बंद झाल्याने अनेक ठीकाणी रस्त्यालगत कचरा पडलेला दिसून येत आहे ,मोठ्या प्रमाणात कचरा सांडल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरुन र्दुगंधी पसरलेली आहे, श्रीवर्धन शहराचे प्रवेशद्वार आराठी ग्रामपंचायत लगत असल्याने सदर आराठी गाव कचर्‍याच्या समस्येने ग्रस्त असल्याने बाहेरुन येणारे पर्यटक सुद्धा असे चित्र बघून वैतागत असल्याचे दिसून येते, आराठी ग्रामपंचायतीने कचर्‍याच्या या विषयावर एवढे महीणे होउनही काहीच परिणामकारक उपाययोजना का करत नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसतात.
          ग्रामपंचायतीत सरपंच ,ग्रामसेवक यांना इतर नागरी प्रश्नांबाबत विचारणा केल्यास वेळ मारुन नेण्यासाठी लेखी अर्ज करा मग उत्तर देवू अशा प्रकारचे उत्तर देणे कीतपत योग्य वाटते असा प्रश्न निर्माण होतो. नागरी प्रश्नांबाबत गतिमान निर्णय न घेता अशाप्रकारे प्रश्न प्रलंबित ठेवून कारभार करणे योग्य नसल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिंकामधून उपस्थित होत आहेत.
          त्याचप्रमाणे आराठी कचर्‍याच्या गंभीर प्रश्नावर इतके महिणे काहीच कारवाई न करण्या मागचे गौडबंगाल कळत नाही!!!
पुरस्कार मिळवणाऱ्या गावांमध्येच नंतर अस्वच्छतेचा कळस गाठला गेल्याचे उदाहरण आराठी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने  समोर आले  आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर