घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी - बहुजन क्रांती मोर्चा म्हसळा यांनी केली म्हसळा नागरपंचायतकडे मागणी. # म्हसळ्यातील नगरसेवक ५ वर्षात काही खास काम करताना कधी दिसले नाहीत, अशी "बोंबाबोंब" सध्या नागरिक करताना दिसत आहेत.
- घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी - बहुजन क्रांती मोर्चा म्हसळा यांनी केली म्हसळा नागरपंचायतकडे मागणी.
- म्हसळ्यातील नगरसेवक ५ वर्षात काही खास काम करताना कधी दिसले नाहीत, अशी "बोंबाबोंब" सध्या नागरिक करताना दिसत आहेत.
म्हसळा (जितेंद्र नटे)- रायगड मत
म्हसळा तालुका कोरोना या महामारीमध्ये होरपळून गेलेला आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने तर पार कंबरडेच मोडले आहे. नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा अवस्थेत त्यांना आपण दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता त्यांच्याकडून जबरदस्ती २०१९-२० ची घरपट्टी - पाणी पट्टी वसूल केली जात आहे, हे दुर्दैवी आहे. आम्ही या निवेदनामार्फत विनंती करीत आहोत कि म्हसळा नागरपंचायत ने म्हसळा शहरातील नागरिकांची घरपट्टी - पाणी पट्टी मोठ्या दिलाने माफ करावी आणि जे १ करोड रुपये आलेले आहेत त्याचा योग्य वापर करावा. असे पत्र बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड संयोजक सलीम अ. उक्ये यांनी लिहिले असून म्हसळा संयोजक महेश जाधव यांनी कार्यकर्त्यासोबत म्हसळा नागरपंचायतच्या कर निर्धारण अधिकारी दीपाली मुंडे यांना सुपूर्द केले.
भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा कार्य अध्यक्ष तथा बहुजन क्रांती मोर्चाचे म्हसळा संयोजक महेश जाधव यांनी केलेल्या या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक पक्ष- अनेक नेते मंडळी असताना मात्र महेश जाधव हे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत अशी चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे. लवकरच म्हसळा नगरपंचायतचे इलेक्शन येऊ घातले आहेत, आरक्षणही पडले आहे. त्यामुळे यावेळी हा मुद्दा गाजणार यात शंकाच नाही. म्हसळ्यातील नगरसेवक ५ वर्षात काही खास काम करताना कधी दिसले नाहीत, अशी "बोंबाबोंब" सध्या नागरिक करताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ज्यांनी काम केले नाही अश्याना जनता घरी बसवल्या शिवाय राहणार नाही.
Comments
Post a Comment