म्हसळा (रायगड) तालुक्यातील खरसई गावातील प्रितेश प्रभाकर माळी याने "वजीर सुळक्या"वर डौलाने तिरंगा फडकवला
म्हसळा (जितेंद्र नटे) :
सहयाद्री मध्ये गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकांच स्वप्न असणारा आणि महाराष्ट्रातील सर्वांत अवघड सुळक्यामधील एक समजला जाणारा सुळका, उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्यांच्या मधोमध 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही जागा आहे. ठाणे जिल्ह्यात शहापुरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका ज्याला वजीर सुळका या नावाने ओळखल जात. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांचा काळजाचा ठोका चुकतो. तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही करणं अशक्य. मात्र ते धाडस म्हसळा (रायगड) तालुक्यातील खरसई गावातील युवक प्रितेश प्रभाकर माळी याने करून वजीर सुळक्यावर डौलाने तिरंगा फडकवला असून ही खरसईच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
निसरडी गवताळ पाऊल वाट, 90 अंश उभी आणि 280 फूट उंच अशी अतिकठिण चढाई. सुळक्याच्या पूर्वेस जवळ जवळ 600 फूट खोल दरी आणि पाण्याची प्रचंड कमतरता. त्यामुळे या सुळक्यावर चढाई करायचे ठरवले आणि चुकून पाय निसटला तर खोल दरीत विश्रांती. मात्र नाशिक च्या पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर टीमच्या साथीने अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे खरसई गावातील प्रितेश प्रभाकर माळी याने.
Comments
Post a Comment