स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना 

स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना 



स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना 


श्रीवर्धन (सोपान निंबरे) 


          अनेक वर्षांपासून दक्षिण रायगडमध्ये अनेक पत्रकार एकत्र काम करत आहेत. यातूनच स्थानिक पत्रकारांना एक हक्काचे व्यासपीठ असावे असा विचार डोकावू लागला. यातूनच आज 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिर्वाण दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन येथे स्थानिक पत्रकारांनी मिळून एक स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना केली. आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिकले पाहजे, संघर्ष केले पाहिजे, जनतेला जागृत केले पाहिजे. बाबासाहेबांचा हा मूळ मंत्र घेऊन स्थानिक लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी स्थानिक पत्रकार नेहमीच अग्रेसर असतात. मात्र ते नेहमीच उपेक्षित राहतात. आपल्या तालुक्यातील जनतेच्या समस्या ते मोठ्या तळमळीने मांडत असतात. अशा पत्रकारांना मात्र नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. याच साठी "रायगड मत"चे संपादक जितेंद्र नटे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव विशेष करून दक्षिण रायगड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांची ही एकमेव संघटना निर्माण करण्यात आली आहे. येथील पत्रकारांना न्याय मिळावा, त्यांना रोजगार मिळावा, सतत धडपड करीत असताना आरोग्यासाठी बरीच तडजोड करावी लागते. अश्याना आरोग्यासाठी मदत मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नुकतीच या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, अन्नधान्य वाटप, आरोग्य शिबीर, शैक्षणिक कार्यक्रम याद्वारे अनेक कार्यक्रम घेऊन समाजपयोगी कार्य करायचे आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी व्यक्त केले.   


          या कार्यक्रमाला "रायगड मत"चे संपादक जितेंद्र नटे, आपलं महानगर व कोकण लाइवचे पत्रकार सोपान निंबरे, प्रेस फोटोग्राफर राजू रिकामे, अमित घोडमोडे, 'रायगड मत"चे माणगाव प्रतिनिधी व्रजेश हिरवे, दै. "रायगडचा आवाज"चे पत्रकार समीर रिसबुड, सुधीर पवार इ. उपस्थित होते. अनेक पत्रकारांना यायला जमले नसले तरी त्यांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. 


स्थानिक पत्रकार संघटना Member's : - 
• म्हसळा : जितेंद्र नटे (संपादक - रायगड मत), योगेश येलवे (News 81रायगड मत), महेंद्र कांबळे (MV News चॅनेल),
• श्रीवर्धन : सोपान निंबरे (आपलं महानगर), रामचंद्र घोडमोडे (रायगड मत), राजू रिकामे - (दै. आ. महाराष्ट्र), विवेक पोटफोडे - (दै. वादळवारा), समीर रिसबुड (दै. रायगडचा आवाज), भारत जाधव (दै. म्हसळा टाईम्स), सर्फराज दर्जी (रायगड टाइम्स, कोकण की आवाज-उर्दू) 
• तळा : संतोष जाधव (आपलं महानगर, News24 मराठी आणि न्यूज-24 महाराष्ट्र), विजय लिमकर (दै. आ. महाराष्ट्र, रायगड मत), श्रीकांत नांदगावकर (दै. लोकमत),
• माणगाव : निरंजन कळस ( रायगड टाइम्स), व्रजेश हिरवे (रायगड मत), सुधीर पवार 
• खालापूर : राकेश खराडे (दै. पुढारी), 
• अलिबाग : मिथुन वैध (दै. लोकमत, रायगड मत), 
• कायदेशीर सल्लागार - एड. मनेश लाड हे राहतील.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर