• भावाला हळद लावून परतणारी बहिण  अपघातात ठार,पती गंभीर 
या अपघाताचे वृत्त कळताच - पत्रकार सय्यद अकबर धावले!
• खांदा कॉलनीनजीक मध्यरात्री भिषण अपघात • वाहनचालक फरार पोलिसात गुन्हा दाखल

पनवेल दि: 27 ( प्रतिनिधी ) भावाच्या लग्नासाठी अंधेरीहून पनवेलला आलेल्या बहिणीला भरधाव गाडीने उडवले. पनवेल खांदा कॉलनीनजीक शंकर मंदिराजवळच झालेल्या या भिषण अपघातात हळदी कार्यक्रम आवरून परतणारी बहिण सोनल राहूल जाधव जागीच मरण पावल्या तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. 26 डिसेंबरला पहाटे 12:30 च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दुर्देवी घटनेमुळे रोडपाली बौद्धवाडीवर  शोककळा पसरली असून शोकाकुल अवस्थेतच भावाला त्याचे लग्न केवळ उपचार म्हणून उरकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
       रोडपाली बौद्धवाडी येथील अनुराग गायकवाड यांचे 27 डिसेंबरला आज लग्न होते.  त्यासाठीच त्यांची बहिण सोनल आणि तिचे पती राहूल अंधेरीहून येथे आले होते. 25 ला रात्री उशिरापर्यंत हळद कार्यक्रम रोडपाली बौद्धवाडीत झाला .तो आवरून सोनल आणि राहूल त्यांच्या स्कुटी क्रमांक MH 46 Q 4334 वरून पनवेल सुकापूर येथे त्यांच्या आईच्या घरी येत होत्या. 
        वाटेत खांदा काॅलनी शंकर मंदिरानजीक त्यांनी गाडी थांबवली. राहुल लघुशंकेसाठी बाजुलाच गेले. सोनल तिथेच उभ्या होत्या.राहूल परतले.त्याचवेळेस एक मोटार भरधाव वेगात आली आणि होत्याचे नव्हते झाले. त्या मोटारीने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या स्कुटीसह सोनल आणि राहूल यांना उडवले. हे नवराबायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाच तो मोटार चालक भरधाव वेगात पळून गेला.रात्री 12:30 ते 1:00 च्या दरम्यान हा अपघात झाला.
         अपघात स्थळी जमलेल्या नागरिकांपैकी एकाने सोनलचा मोबाईल काढून घेऊन तिच्या भावाला कळवले. सोनलचा सख्खा भाऊ रोहन गायकवाड पाठोपाठ  येत होता .तोही घटनास्थळी आला. त्यानंतर पोलीस,  सोनल यांचे कळंबोलीतील भाऊ संदिप जाधव तसेच इतर नातेवाईक आले. अपघातग्रस्तांना लगेचच कामोठे MGM रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोनल यांना मृत घोषित करण्यात आले. तर राहूल यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. 
      पोलिसांनी याप्रकरणात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना घटनास्थळी अज्ञात वाहनाच्या पुढच्या लाईटचे भाग मिळाले आहेत. आता CCTV च्या चित्रणावरून पोलिस तपास करत आहेत. 



या अपघाताचे वृत्त कळताच - पत्रकार सय्यद अकबर धावले!

क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे अध्यक्ष पत्रकार सय्यद अकबर तात्काळ पोलीस ठाण्यात पोचले.  त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांची भेट घेऊन याबाबत माहीती दिली. सोनवणे यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश करचे यांना बोलावून घेतले. घटनेची माहीती घेऊन तपासाबाबत मार्गदर्शक सुचनाही केल्या.  

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर