ओएनजीसी महामार्गावरील खड्डे सुरक्षा रक्षकांनी बुजविले
पनवेल : राज भंडारी
पनवेल शहरालगत जाणाऱ्या मुंबई पुणे - गोवा महामार्गावरील ओएनजीसी येथील सिग्नल जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित विभागाला दिसून येत नसल्यामुळे अखेर शनिवारी येथील ओएनजीसी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी हे खड्डे स्वकर्तुत्वाने भरून काढले आहेत.
मुबई पुणे - गोवा जुना हायवे लगत ओएनजीसी गेट सिग्नल जवळ खुप मोठे खड्डे पडले होते, त्यामध्ये बाईक स्वार खुप मोठ्या प्रमाणात पडून जखमी होत होते तसेच महिला लहान मुलांना गाडीवर घेउन दुचाकीस्वार पडले आहेत. शनिवारी सकाळी एक बाईक सवार पडला व त्याच्या चेहऱ्यावर तसेच डोक्याला मार लागला आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता येथील सामाजिक कार्यकर्ते बाळाराम चिखलेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बळ ओएनजीसी गेट यांच्या साहाय्याने सदरचे खड्डे बुजवण्यात आले. सदरचे खड्डे बुजवण्यात आल्यामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून ओएनजीसी सुरक्षा रक्षकांचे आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment