रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल पालिका
"पनवेल महानगर हरित आणि स्मार्ट व्हावा हेच माझे ध्येय आहे.कित्येकवेळा मी महासभेत शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केले होते तशी रस्त्यांची यादी ही जाहीर केली होती. शहरातील बहुतांशी रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले आहे "
पनवेल :
पनवेल शहरातील बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मात्र अजूनही मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होणे बाकी आहे. तरीदेखील आगरी समाज हॉल रस्ता, कै.शांताबाई गणपत घाडगे मार्ग (नवीन कोर्टाच्या मागील बाजूस), रूपाली सिनेमा येथील रस्ता (महाराष्ट्र बँक ते रूपाली सिनेमा थेटर), जुने कोर्ट ते पाडा मोहल्ला बडी मस्जिद, पाडा मोहल्ला बडी मज्जिद ते शनी मंदिर, शनी मंदिर ते हॉटेल पंचरत्न, नाडकर्णी हॉस्पिटल ते प्रिन्स पॅराडाईस सोसायटी येथील रस्ता या रस्त्याची तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी पनवेल पालिकेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत आहे.पनवेल हे तालुक्याचे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मोठी बाजारपेठ याच शहरात आहे, पनवेल शहरात रोज लाखोंच्या संख्येने नागरिक खरेदी विक्रीच्या दृष्टीने ये जा करत असतात. त्यामुळे दररोज वाहनांची मोठी वर्दळ शहरात पहावयास मिळते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांचे सिमेंट कोंक्रीटीकरण करणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment