म्हसळा पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या
• म्हसळा पोलिसांची जबरदस्त कामगिरी - केला टेक्नॉलॉजिचा वापर
म्हसळा / जितेंद्र नटे @ रायगड मत
काही दिवसांपूर्वी म्हसळा तालुक्यात काही अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला होता. दोन ठिकाणी चोरी करत एका ठिकाणी तर चक्क पत्रे काढून दुकानातून मोबाईल्स चोरले होते. हे भुरटे चोर चोऱ्या माऱ्या करून ठिकाण बदलत असतात. 19/10/2020 रोजी मध्यरात्री दोन दुकाने फोडली होती. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर म्हसळा पोलीस स्टेशनचे डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी आपल्या सहकारी एस. एन. चव्हाण आणि इतर पोलिसांच्या मदतीने चोरांना शोधण्याची धडक मोहीम
राबवली.
सदर शोध मोहीम राबवत असताना कोणताही भौतिक पुरावा उपलब्ध नसताना म्हसळा पोलिसांनी चोराच्या मुसक्याच आवळल्या. केवळ तांत्रिक पुराव्याच्या आधारे म्हसळा आदीवासी वाडी येथील संतोष किसन पवार वय 20 वर्षे याला ताब्यात घेतले. याकामी म्हसळा पोलीस पोहवा 847 संतोष चव्हाण, पोहवा शशिकांत कासार, पोना /1303 सूर्यकांत जाधव, पोशी/572 मल्हारी तोरसले, पोशी/2255 विजय फोपसे, प्रकाश हंबीर, राहूल राठोड, शाम कराडे, यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.
सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला प्रथम न्यायदंडाधीकारी श्रीवर्धन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी 11/11/2020 पर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा./847 एस. एन. चव्हाण हे करीत आहेत.
Comments
Post a Comment