म्हसळा नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार!
स्वच्छते वर लाखो रुपये केलेले खर्च ? गेले कुठे?
म्हसळा (जितेंद्र नटे) @ रायगड मत
म्हसळा नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. नगरपंचायत ने स्वच्छते वर लाखो रुपये खर्च करून देखील नगरपंचायत परिसर स्वच्छ नाही आहे. नगरपंचायत ने स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून .म्हसळा शहरातील गटारे उघड़ी असून जागोजागी कचरा पडलेला. गटारे सांड़पाण्यानी तुटुंब भरली आहेत, याच्या कड़े नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गधी व रोगराईला सामोरे जावे लागत आहे या करिता भारतीय जनता पार्टी तरफे निवेदन देण्यात आले. निवेदन घेताना नगरपंचायत मा. मुख्याधिकारी यांनी आश्वसन दिले आहे की येत्या एका आठवड्यात म्हसळा शहर स्वच्छ दिसेल. यावेळी तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश रायकर, शहर अध्यक्ष श्री.संतोष पानसरे, तालुका सरचिटणीस श्री.सुनिल शिंदे, तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, जिल्हा चिटणीस श्री. तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.दुर्जनसिंग राजपूत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. राजेंद्र चव्हाण, सुबोध पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
Attachments area
Comments
Post a Comment