• ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा  • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले. • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा


  • • ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा  

  • • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले.

  • • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा



म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmt.page


        म्हसळा समाजाचा आज ओबीसी आरक्षण बचावासाठी जबरदस्त धडक मोर्चा निघाला. तालुक्यातील ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा आज संघर्षमय मोर्चा पाहायला मिळाला. आपल्या प्रमुख मागण्यासहित अनेक कार्यकर्ते पण ठराविक कार्यकर्त्यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयाला धडक दिली. आपल्या प्रमुख मागण्या सरकार कडे मागत जबरदस्त असे एल्गार उभे केले. या मोर्चा चे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी सामील झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, शिव सेना तालुका अध्यक्ष महादेव पाटील, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहराध्यक्ष मंगेश मुंडे, राष्ट्रवादीच्या रेश्मा कानसे, भाजपचे गणेश बोर्ले, ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन भिकाजी उंडरे, राजाराम पाटील, संदेश शिगवण, इत्यादी अनेक समाज सेवक व नेते सहभागी झाले होते. 
       पक्ष अनेक मात्र उद्देश एकच ओबीसी बचाव असा संसानिखेज नारा भाजप म्हसळा अध्यक्ष प्रकाश रायकर व मंगेश मुंडे यांनी लगावला. महादेव पाटील यांनी तर ये तो झांकी हैं, पिच्चर अभी बाकी हैं असा संसानिखेज इशाराच सरकारला दिला. ते पुढे म्हणाले तुम्ही मराठा आरक्षण द्या पण आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर देशात हडकम्प उडवून लावू. आजचा मोर्चा फक्त सॅम्पल आहे, गरज पडली तर करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरू एवढे लक्षात ठेवा. 
         उपाध्यक्ष बबन उंडरे यांनी आपल्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधून धरले, "जनगणना जातनिहाय करावी, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, कोणत्याही कारणास्तव मेघाभरती थांबवू नये,        ओबीसींच्या महाज्योती या संस्थेसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या त्यांनी आपल्या दिलेल्या पत्रात मांडल्या आहेत. तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार भिंगारे यांनी त्यांचे दिलेले पत्र स्वीकारले असून ते त्वरित मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवले जाईल असे सांगण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर