खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे यांचा गुटखा विक्री करणाऱ्यांना दणका; लाखोंचा गुटखा टेंपोसह हस्तगत…
- वपोनि देवीदास सोनावणे.
"खांदा वसाहत परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर धंदे, मटका, जुगार, गुटखा विक्री, दारू विक्री, दादागिरी, खंडणी आदी प्रकार चालू देणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी".
पनवेल / संजय कदम
महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात परराज्यातून गुटखा आणून तो पनवेल परिसरात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला खांदेश्वर पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित वपोनि देवीदास सोनावणे यांनी दणका देत लाखो रूपये किंमतीचा गुटखा टेंपोसह हस्तगत केला आहे.
सुकापूर एक्सप्रेस वे पूलाखाली महेंद्र टेंपो नं.- जीजे 21-डब्लू-9611 यातून काही इसम बेकायदेशीररित्या गुटखा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वपोनि देवीदास सोनावणे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कामत, पोलिस उपनिरीक्षक पावणे, पोलिस हवालदार खांडेकर, पोलिस नाईक अहिरे, सरगर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी पुरणदास वैष्णव (वय-32), दिपक गोड (वय-30), प्रभुदयाल मारवाडी (वय-45) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेला महेिंद्रा कंपनीचा टेंपो व टेंपोत असलेला बेकायदेशीर गुटखा असा मिळून जवळपास 4, 43, 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments
Post a Comment